एक्स्प्लोर

Share Market : रखडलेला भारत- अमेरिका व्यापार करार, टॅरिफच्या संकटामुळं विदेशी गुंतवणूकदार सतर्क, 21 हजार कोटी काढून घेतले, जाणून घ्या कारण

FPI Share Market : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात जोरदार शेअर विक्री केली आहे. जुलै महिन्याचा ट्रेंड त्यांनी ऑगस्ट महिन्यात देखील कायम ठेवला आहे.

Foreign Investors Outflow नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लांबणीवर पडला आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतात येणार होतं, मात्र त्यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केलं आहे. याची अंमलबजावणी 27 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 21 हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे.

डिपॉजिटरीच्या ताज्या आकडेवारीनुसार 2025 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1.16 लाख कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार संस्था सतर्कता बाळगत आहेत.

विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढणं सुरुच

एंजल वनचे सीएफए वकार जावेद खान यांनी म्हटलं की अमेरिका आणि रशियातील तणाव सध्या कमी झाला आहे, नव्यानं बंधनं घालण्यात आलेली नाहीत.अमेरिकेनं भारतावर लादलेलं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. हा बाजारासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. ते असं देखील म्हणाले की एस अँड पीनं भारताचं रेटिंग BBB- वरुन BBB केलं आहे. ज्यामुळं विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या विक्रीच्या धोरणात बदल होऊ शकतो.

डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 14 ऑगस्टपर्यंत 20975 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर, जुलै महिन्यात त्यांनी 17741 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करत पैसे काढून घेतले होते. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांनी मार्च ते जून या तीन महिन्यांमध्ये 38673 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

तज्ज्ञांचा अंदाज काय?

मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाच्या सहयोगी संचालक हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते विदेशी गुंतवणूकदार वारंवार पैसे काढून घेत आहेत याचं कारण जागतिक अनिश्चितता आहे. युद्ध, अमेरिका आणि तर विकसित देशांमध्ये टॅरिफच्या दरांवरुन सुरु असलेले मतभेद, अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यानं भारतासारख्या विकसित होणाऱ्या बाजारांमधील विदेशी गुंतवणूकदारांचं आकर्षण घटलं आहे.

जियोजीत इन्वेस्टमेंटसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार वी.के. विजयकुमार यांच्या मते कंपन्यांचे कमजोर निकाल, उच्च मूल्यांकन हे विदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या विक्रीचं मोठं कारण आहे. एफपीआयनं बाँडमध्ये 4469 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Embed widget