Air India VRS Scheme : नॉन फ्लाइंग कर्मचार्‍यांना टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियानं पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजनेची (VOLUNTARY RETIREMENT - VRS) ऑफर दिली आहे. टाटा समुहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर वर्षभरात कर्मचाऱ्यांना अशी दुसऱ्यांदा ऑफर दिली आहे. स्वेच्छा निवृत्ती (VRS) ऑफरद्वारे एअर इंडियाला कर्मचार्‍यांचा खर्च कमी करायचा. त्याशिवाय कर्मचारी कपात टाळण्यासाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचं समजतेय. एअर इंडियाने 30 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे.   


टाटा समुहाने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडिया ताब्यात घेतलं. त्यानंतर आता दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे. स्वेच्छा निवृत्तीची ऑफर 40 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या आणि एअरलाईनमध्ये कमीत कमी पाच कायमस्वरुपी वर्ष सेवत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आहे. त्याशिवाय लिपिक किंवा नॉन स्कील श्रेणीतील कर्मचारी ज्यांनी किमान पाच वर्षे सेवा केली असेल ते सु्द्धा स्वेच्छा निवृत्तीची ऑफर स्विकारु शकतात. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियातील जवळपास 2100 कर्मचारी  स्वेच्छा निवृत्ती योजनेचा (VOLUNTARY RETIREMENT - VRS) लाभ घेऊ शकतात. 17 मार्च ते 30 एप्रिल 2023 पर्यंत कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. 31 मार्च 2023 पर्यंत स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना एक्स ग्रॅशिया शिवाय एक लाख रुपये देण्यात येणार आहे. 


जानेवारी 2022 मध्ये टाटा समुहाने एअर इंडियाची सुत्रे हातात घेतली. त्यानंतर जून 2022 मध्ये एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजनेची (VOLUNTARY RETIREMENT - VRS) ऑफर दिली होती. 4200 पात्र कर्मचाऱ्यांपैकी 1500 जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यावेळी त्यांना एक्स ग्रॅशियाशिवाय एक लाख रुपये मिळाले होते. आता दुसऱ्यांना एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे. जवळपास 2100 कर्मचारी या योजनेसाठी पात्र असल्याचे समजतेय. 


एअर इंडियाची Vihaan.AI योजना


एअर इंडियाने  सप्टेंबर 2022 मध्ये Vihaan.AI परिवर्तन योजना जाहीर केली होती. या योजनेद्वारे 5 वर्षांच्या कालावधीत विविध उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या योजनेद्वारे एअर इंडियाला विकसित, फायदेशीर आणि बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवणारी एअरलाइन बनवणं हा उद्देश आहे. सध्या यावर काम सुरु आहे. 


एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार
एअर इंडिय एकूण 840 एअरबस (Airbus) आणि बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार आहे. अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यातील हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार ठरणार आहे.