Air India : टाटा समूहाच्या एअर इंडियासंदर्भात (Air India) मोठी बातमी समोर आली आहे. एअर इंडियाला 80 लाख रुपयांचा दंड (Fine) करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA ने हा दंड केला आहे. हवाई वाहतुकीसंदर्भात एअर इंडियानं काही नियमांकडे दुर्लक्ष (non compliance of DGCA rules) केल्यामुळं ही कारवाई करण्यात आलीय. नेमकं प्रकरण काय? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात. 


नेमकं प्रकरण काय?


नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियानं फ्लाइट क्रू मेंबर्सच्या आरोग्याच्या संदर्भातील नियमांचे योग्य ते पालन केलं नाही.  क्रू मेंबर्सना विश्रांती देण्यात आली नाही. कामाच्या वेळेच्या संदर्भात त्यांचं योग्य व्यवस्थापन झालं नाही. त्यामुळं  DGCA ने एअर इंडियाला 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच DGCA दिलेल्या माहितीनुसार 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या दोन क्रू मेंबर्ससह उड्डाण केले होते. 


नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचं म्हणणं काय?


नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमानुसार कोणत्याही विमान वाहतूक कंपनीला लांब ठिकाणी विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी क्रू मेंबर्सना योग्य ती विश्रांती प्रदान करणं गरजेचं आहे. तसेच विमान इच्छितस्थली पोहोचल्यानंतर देखील क्रू मेंबर्सना विश्रांती प्रदान करण्याची विमान कंपनीची जबाबदारी असते असे मत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं व्यक्त केलं आहे. दरम्यान, या विश्रांतींच्या संदर्भात DGCA एअर इंडियाला कारणे दाखवा अशा स्वरुपाची नोटीस देखील पाठवली होती. मात्र, या नोटीसला एअरलाईनने योग्य त्या प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यामुळं DGCA ने एअर इंडिया 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 


विमान वाहतूक कंपन्यांनी DGCA ने दिलेल्या नियमांच्या बाबतीत सतर्क राहावं


DGCA च्या नियमानुसार,  क्रू मेंबर्सचा थकवा दूर व्हावा यासाठी त्यांना आठवड्याच्या शेवटी 48 तासांची म्हणजे दोन दिवसांची विश्रांती देणं गरजेचं आहे. यापूर्वी हा नियम 36 तासांचा होता. तसेच जर क्रू मेंबर्सला रात्रीच्या वेळचे उड्डाण करायचे असेल तर त्यासाठी देखील वेगळे नियम आहेत. रात्रीच्या वेळी म्हणजे 12 ते 6 या काळात जर विमानाचं उड्डाण करायचं असेल तर पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी उड्डाणाचे तास हे 10 तास करण्यात आले आहेत. पूर्वी हे तास 13 होते. त्यामुळं प्रत्येक विमान वाहतूक कंपनीनं DGCA ने दिलेल्या नियमांच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे. अन्यथा नियमांचा भंग झाल्यास कोरवाई होऊ शकते.


महत्वाच्या बातम्या:


समुद्रकिनारची 'एअर इंडियाची' ऐतिहासिक वास्तू मिळणार महाराष्ट्र सरकारला, द्यावे लागणार 'एवढे' पैसे