Adani Family: अदानी समूहाची मालकी असलेल्या अदानी कुटुंबानं (Adani Family) आज 4251 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंबुजा सिमेंटचे शेअर्स (Ambuja Cement Shares) विकून त्यांना हे पैसे मिळाले आहेत. आता अदानी हे पैसे कुटुंब समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे. या विक्रीद्वारे, अदानी कुटुंब 125 अब्ज डॉलर किंमतीचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करत आहे. यामध्ये GQG Partners, National Pension System Trust आणि SBI Life Insurance सारख्या मोठ्या कंपन्यांनी अंबुजा सिमेंटचा हा स्टेक विकत घेतला आहे.
GQG पार्टनर्सने 1679 कोटी रुपयांचे स्टेक विकत घेतले
स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, GQG पार्टनर्सने अंबुजा सिमेंटमध्ये ((Ambuja Cement ) सर्वाधिक 1679 कोटी रुपयांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने 525 कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्सने सुमारे 500 कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, अदानी कुटुंब आपल्या समूह कंपन्यांमधील भागीदारी कमी करत आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत.
अदानी समूह पायाभूत सुविधांवर 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
अदानी समूह पायाभूत सुविधांवर 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाची पुढील दशकात पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आहे. यातून ते या आर्थिक वर्षात 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. माहितीनुसार, अनेक गुंतवणूकदार भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करत आहेत. अशा स्थितीत अदानी कुटुंब भविष्यातही इतर कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणे सुरू ठेवेल, अशी अपेक्षा आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर शुक्रवारी 633 रुपयांवर बंद झाला. या ब्लॉक डीलमध्ये कंपनीचे शेअर्स 625 रुपयांना देण्यात आले आहेत.
अदानी कुटुंबाचा अंबुजा सिमेंटमध्ये 67.3 टक्के हिस्सा
अदानी कुटुंबाचा आता अंबुजा सिमेंटमध्ये 67.3 टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाने मे 2022 मध्ये स्विस फर्म होल्सिमकडून ही कंपनी खरेदी केली होती. आता अदानी कुटुंबही अदानी पॉवरमधील आपला हिस्सा 3 टक्क्यांनी कमी करणार आहे. मात्र, ही विक्री कधी होणार याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अदानी कुटुंब आपल्या समूह कंपन्यांमधील भागीदारी कमी करत आहे.
महत्वाच्या बातम्या :