नवी दिल्ली : आधार कार्ड संदर्भात यूआयडीएआयनं मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार हॉटेल्स, एखाद्या इव्हेंटच्या ठिकाणी किंवा समकक्ष कार्यक्रमांसाठी आाधार कार्डची फोटो कॉपी स्वीकारण्यावर बंदी घातली जाणार आहे. आधार कार्डची फोटो कॉपी जमा करुन ठेवणं सध्याच्या आधार कायद्याचा भंग करत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं. 

Continues below advertisement

यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी हॉटेल्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स यांच्यासाठी आधार बेस्ड पडताळणीसाठी नव्या रचना तयार करणार असल्याचं म्हटलं. यासाठी  नोंदणी करुन नव्या पडताळणी प्रक्रियेचा एक्सेस मिळवता येणार आहे. 

भुवनेश कुमार यांनी पीटीआय सोबत बोलताना म्हटलं की पडताळणी प्रक्रिया क्यू आर कोड स्कॅनिंग किंवा नव्यानं विकसित केल्या जाणाऱ्या आधार मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करता येईल. 

Continues below advertisement

नव्या नियमांना यूआयडीआयनं मंजुरी दिली असून हे नियम लवकरच नोटिफाय केले जाणार आहेत. पेपर बेस्ड आधार पडताळणीची प्रक्रिया बंद करण्यासाठी नवी प्रणाली आणली जाणार आहे. 

 नव्या पडताळणी प्रक्रियेत सेंट्रल आधार डेटाबेसच्या इंटरमिडीएटरी सर्व्हरवर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आव्हान असेल.  हॉटेल्स किंवा इतर संस्थाना ऑफलाईन ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. त्यानंतर एपीआयचा एक्सेस मिळेल. 

यूआयडीएआय सध्या बेटा टेस्टिंग प्रक्रियेत नव्या ॲप्लिकेशनचा सपोर्ट ॲप टू ॲप असेल ज्यामुळं सेंट्रल सर्व्हरला कनेक्ट न करता प्रत्येक पडताळणी पार पडेल. याचा वापर विविध ठिकाणी करता येऊ शकेल. यामध्ये विमानतळ आणि रिटेल आऊटलेटचा देखील समावेश असेल. 

भुवनेश कुमार यांनी नव्या पडताळणी प्रक्रियेमुळं गोपनीयता संरक्षण वाढेल, असं म्हटलं. यामुळं पेपर बेस्ड आधार पडताळणीमधील धोके यामुळं कमी होतील, असं त्यांनी म्हटलं.

वेरिफिकेन प्रक्रियेतील सुधारणांमुळं ऑफलाईन पडताळणी  पेपरशिवाय केली जाईल. यामुळं आधार डेटा लीक होण्याचा किंवा गैरवापर होण्याचा धोका कमी होतो. 

ॲपमधील सुधारणांमुळं डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याला समर्थन मिळेल. ज्याची अंमलबजावणी 18 महिन्यात केली जाणार आहे. यूजर्सला पत्त्याचा पुरावा आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश त्यांच्या मोबाईल फोन शिवाय त्याच ॲपवर करता येईल.