8th Pay Commission News : 8व्या वेतन आयोगाबाबत देशभरात चर्चा वेग घेत आहे. विविध कर्मचारी संघटना सरकारसमोर आपल्या मागण्या मांडत असून त्यामध्ये ट्रान्सपोर्ट अलाउंस (TA) आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात वाढ करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. अलीकडेच देहरादून येथे बैठक झाल्यानंतर आता दिल्लीतही पुढील चर्चांना वेग येणार आहे. प्रगतिशील शिक्षक न्याय मंच (PSNM) या संघटनेनेही आपल्या महत्त्वाच्या मागण्या आयोगासमोर सादर केल्या आहेत.

Continues below advertisement

Education Allowance Hike : शिक्षण भत्ता वाढवण्याची मोठी मागणी

PSNM च्या प्रस्तावानुसार, सध्या सुमारे 2,800 रुपयांपर्यंत असलेला चाइल्ड एजुकेशन अलाउंस वाढवून 7,000 रुपये प्रतिमहिना करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा भत्ता सध्या 12वीपर्यंतच्या शिक्षणासाठी दिला जातो. मात्र तो पदवीपर्यंत लागू करण्याचीही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासोबतच डिजिटल गरजांसाठी दरमहा 2,000 रुपयांचा स्वतंत्र भत्ता देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

Transport Allowance : TA मध्ये मोठी वाढ शक्य

कर्मचारी संघटनांनी ट्रान्सपोर्ट अलाउंस (TA) बेसिक पगाराच्या 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. पर्यायी स्वरूपात किमान 9,000 रुपये + डीए इतका TA निश्चित करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. सध्या वेगवेगळ्या स्तरांनुसार 1,800 ते 7,200 रुपयांपर्यंत TA दिला जातो.

Continues below advertisement

Leave Policy Changes : सुट्ट्यांमध्येही बदलाचा प्रस्ताव

याशिवाय कॅज्युअल लीव्ह 14 दिवस, अर्न्ड लीव्ह 30 दिवस आणि मेडिकल लीव्ह 20 दिवस करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवृत्तीवेळी मिळणाऱ्या अर्न्ड लीव्ह एन्कॅशमेंटची मर्यादा 300 दिवसांवरून 400 दिवसांपर्यंत वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.

Government Decision 8th Pay Commission : सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

या सर्व मागण्यांवर केंद्र सरकार आणि वेतन आयोग काय निर्णय घेतो, याकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर या प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा: