Investment Fraud News : गुंतवणुकीत (investment) चांगला परतावा देण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या टोळीकडून उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या डिफेक व्हिडिओचा वापर (Use of Defect Video) करुन फसवणूक करण्याच आली आहे. या व्हिडिओत मुकेश अंबानी हे 'राजीव शर्मा ट्रेड ग्रुप' याकंपनी बद्दल उच्चार करत आहेत. या कंपनीमध्ये BCF मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत असल्याचा तो व्हिडिओ आहे.


ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


दरम्यान, या आधीही मार्च महिन्यात अशाच प्रकारे गुंतवणूक कण्याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करण्यात आला होता. दरम्यान, डॉ. के. के. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मे ते 10 जून दरम्यान जास्त परतावा देण्याच्या नावाखाली संबधित कंपनीत 7 लाखांची गुंतवणूक 16 वेगवेगळ्या खात्यांवर पाठवली आहे. मात्र, कालंतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाटील यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसानी अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणूक आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


'मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलतोय, तुमच्या मोबाईलवरुन मनी लाँड्रिंग, पैसे द्या, नाहीतर...'; नाशिकमध्ये वृद्धास लाखोंना लुटले