31st March Deadline: मार्च महिना निम्मा संपला आहे. म्हणजे ह आर्थिक वर्ष संपायला फक्त 13 दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी म्हणजेच 31 मार्चपूर्वी काही महत्वाची कामे प्रत्येकानं पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण, 31 मार्चनंतर त्या कामांची मुदत संपणार आहे. त्यापूर्वीचं ही कामं पूर्ण करावी, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात 31 मार्चपूर्वी कोणती कामं पूर्ण करायची आहेत. 


आयकर बचत


आयकर बचतीच्या संदर्भातील निर्णय तुम्हाला 31 मार्चच्या आतच घ्यावा लागेल. कारण, आयकर बचत पर्यायाचा निवड करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या उत्पन्नावरचा टॅक्स वाचवायचा असेल तर गुंतवणूक करु शकता. दरम्यान, तुम्ही जर 31 मार्चनंतर हे काम केलं तर तुम्हा आयकरातून सूट मिळमार नाही. त्यामुळं त्यापूर्वीच ही कामं करुन घेणं गरजेचं आहे. 


फास्टॅग केवायसी पूर्ण करावी 


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) फास्टॅग ग्राहकांनी त्यांची फास्टॅग केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी. तुम्ही अद्याप फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग नंतर काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो. फास्टॅग ही महामार्गावरील टोल गोळा करण्याची ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे बँक खात्याशी किंवा प्रीपेड कार्डशी जोडलेल्या कारच्या विंडस्क्रीनवर स्थापित केलेल्या टॅगमधून RFID तंत्रज्ञान वापरून पैसे कापले जातात.


SBI अमृत कलश योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत 31 मार्च


SBI अमृत कलश योजना ही ठेवीदारांना चांगला लाभ मिळवून देणारी योजना आहे. या योजनेते गुंतवणूकदारांना 7.10 टक्के व्याजदर मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के म्हणजे 7.60 परतावा मिळतो. दरम्यान, या योजनेचा ज्या ग्राहकांना लाभ घ्यायचा आहे, त्या ग्राहकांनी 31 मार्चच्या आतच लाभ घ्यावा, अन्यथा 31 मार्चनंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.


31 मार्चपूर्वी आधार अपडेट करा


यूआयडीएआयने आधार अपडेटसाठी मोफत अपडेट सुरू केले होते. यामध्ये तुम्ही घरबसल्या सहजपणे तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकता. तुम्ही आधार केंद्रावर गेला तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. त्यामुळं तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार अपडेट करा.


SBI WeCare विशेष ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत 31 मार्च


SBI WeCare विशेष ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे.  SBI WeCare विशेष ठेव योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकता. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत चांगला परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. 


महत्वाच्या बातम्या:


जगातील 'या' 8 देशात आयकर आकारला जात नाही, कारण....