नई दिल्ली : महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि खेळाडूंना हक्काचे व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (MCA) आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी महिला टी-20 मुंबई लीगसाठी ठाणे स्कायरायझर्स संघ सज्ज झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष समारंभात विमेन्स लीग अंतर्गत ठाणे स्कायरायझर्सच्या अधिकृत “जर्सीचे” प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. याप्रसंगी संघाची कर्णधार सायमा ठाकोर हिच्यासह सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक उपस्थित होते.

Continues below advertisement

ठाण्यातील पहिल्या महिला क्रिकेट संघाची घोषणा या निमित्ताने करण्यात आली असून, ​या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात एका विशेष व्हिडिओ सादरीकरणाने झाली. या व्हिडिओमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रवास, खेळाडूंचा मैदानावरील संघर्ष आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाचे क्षण दाखवण्यात आले."BUILT WITH AMBITION" आणि "MORE THAN A JERSEY" अशा प्रभावी संदेशांसह ठाणे स्कायरायझर्सची जर्सी पडद्यावर झळकली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

​या प्रसंगी खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा देताना आमदार प्रताप सरनाईक यांनी महिला क्रीडा क्षेत्रातील या उपक्रमाचे कौतुक केले. हा संघ केवळ ठाण्याचे प्रतिनिधित्व करणार नाही, तर महिला क्रिकेटमधील नव्या पर्वाची सुरुवात करेल. ठाण्यातील महिला खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची मोठी संधी याद्वारे मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी हा संघ कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Continues below advertisement

संघाची धुरा सांभाळणारी कर्णधार सायमा ठाकोर हिनेही यावेळी आपला आत्मविश्वास व्यक्त केला. ती म्हणाली, आमच्या संघात अनेक युवा आणि गुणवान खेळाडू आहेत, जे संघाला विजय मिळवून देण्यास सक्षम आहेत. या स्पर्धेसाठी आम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत आणि पूर्वतयारी केली असून, मैदान गाजवण्यासाठी आमचा संघ पूर्णपणे सज्ज आहे.

संघाची मालकी आणि प्रमुख नेतृत्व ​ठाणे स्कायरायझर्स या संघाच्या पाठीशी खंबीर नेतृत्व आणि क्रीडाप्रेमी व्यवस्थापन उभे आहे. या संघाचे अधिकृत मालक म्हणून खालील मान्यवर धुरा सांभाळत आहेत. ​विहंग प्रताप सरनाईक, ​अनाहिता विहंग सरनाईक, ​शिल्पा मोहित सिंघाल, ​मोहित सिंघाल, ​प्रतीक शेळके, ​यासर्व क्रीडाप्रेमी आयोजकांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे ठाण्यातील महिला क्रिकेटला एक नवी आणि हक्काची दिशा मिळाली आहे.