चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2018 08:50 AM (IST)
कामात बढती, पगारवाढ वा तत्सम फायदे मिळावेत म्हणून पुरुषांनी आपल्या बायकोला बॉसकडे पाठवणे – या विषयावर एका काळात अनेक कथा, नाटकं वगैरे आली. नैतिकतेचे मुद्दे चघळले गेले. बायकांची अगतिकता अधोरेखित केली गेली. लग्न झालेली बाई ही नवऱ्याची अधिकृत वेश्याच असते, अशा धाटणीची खळबळजनक विधानंही केली जाऊ लागली. मग ‘आमच्या शरीरावर आमचा हक्क’ ही चळवळ आली आणि ती ‘सेक्सवर्कर्स’संदर्भात जास्त चर्चिली गेली तरीही नवतरुणींवर त्या विचारांचा परिणाम झालाच.
‘लेदर करन्सी’ हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदा ऐकला होता, तेव्हा अत्यंत भय, घृणा, संताप अशा अनेक भावना एकाचवेळी मनात उसळून आल्या होत्या. मानवी वाहतुकीचा प्रश्न समजून घेताना ज्या एकेक हकीकती ऐकल्या, त्या अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. त्या वयात अनेक बाळबोध प्रश्न पडत. या प्रश्नांची आपल्या अल्पमतीनुसार काहीतरी थातूरमातुर उत्तरं शोधून, गैरसमज जोपासत नेण्यापेक्षा अभ्यास करत बौद्धिक कुवत वाढवत न्यावी, हे सांगणारी फिल्डवर्क आणि टेबलवर्क या दोन्हींची सांगड घालणारी माणसं भेटली; त्या वाटेवर आजही चालतेच आहे. अनेक पातळ्यांवरच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींशी बोलताना ‘इझी मनी’ हा तेव्हा लोकप्रिय असलेला अजून एक शब्दप्रयोग किती फिजूल आहे हे कळत गेलं. ‘चांगल्या घरांमधल्या मुली पैशांसाठी तात्पुरता वेश्याव्यवसाय करतात’ हा गैरसमज त्या दशकात प्रचंड फोफावलेला होता. त्यात अनेकदा विशिष्ट महाविद्यालयांची नावंही जोडली जात. हा काळ झपाट्याने बदलला तो एड्स या रोगाच्या आगमनाने. त्याने असंख्य उलथापालथी घडवल्या आणि मध्यमवर्गीय विचार, नीतीमूल्यांच्या पारंपरिक कल्पना, आदर्श नात्यांच्या कल्पना अशा अनेक गोष्टींना चूड लावली. अनेक गोपनीय मानली जाणारी सत्यं उघडी पडली. यातून दोन टोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. नेहमीप्रमाणे स्त्रियांनाच दोषी व जबाबदार ठरवून त्यांच्यावरची बंधनं वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि ढोंगीपणा उलगडत गेल्याने नव्या पिढीतील स्त्रिया अधिक व्यवहारी आणि बंडखोर बनल्या. आय पिल्सचा वापर मधल्या एका काळाच्या तुकड्यात अमाप वाढला होता, पण त्याचे दुष्परिणाम वेळेत चर्चिले गेले आणि त्याहून ‘सुरक्षित संभोग उचित’ असल्याचं भान अविवाहित तरुणींना येत गेलं. लग्नाआधीच्या गर्भपातांचं प्रमाण निदान शहरी भागांमध्ये कमी होत गेलं आणि ग्रामीण भागातलीही कुमारी मातांची संख्या घटत गेली. ‘लैंगिक संबंधांमधलं पावित्र्य’ ही संकल्पना मुळात स्त्रियांपुरतीच शिल्लक होती, पुरुषांशी पावित्र्याचं काही देणंघेणं नव्हतं; आता स्त्रियाही ती धुडकावून लावू लागल्या. प्रेम, सेक्स, लग्न, मूल, कुटुंब यांच्यातल्या रचनांची या काळात झपाट्याने मोडतोड झाली; मात्र पर्यायी नवी उचित रचना निर्माण करता आली नाही. लिव्ह इन हा शब्दप्रयोग चर्चेत आला खरा, पण तो फारच किरकोळीत जमा राहिला. आर्थिक स्तर, प्रदेश, जात-धर्म यानुसार हे सगळं कमीअधिक फरकाचं आहेच, त्यामुळे सरसकटीकरण अर्थातच करता येणार नाही; मात्र ही सर्वसाधारणपणे दिसणारी वस्तुस्थिती आहे. कामात बढती, पगारवाढ वा तत्सम फायदे मिळावेत म्हणून पुरुषांनी आपल्या बायकोला बॉसकडे पाठवणे – या विषयावर एका काळात अनेक कथा, नाटकं वगैरे आली. नैतिकतेचे मुद्दे चघळले गेले. बायकांची अगतिकता अधोरेखित केली गेली. लग्न झालेली बाई ही नवऱ्याची अधिकृत वेश्याच असते, अशा धाटणीची खळबळजनक विधानंही केली जाऊ लागली. मग ‘आमच्या शरीरावर आमचा हक्क’ ही चळवळ आली आणि ती ‘सेक्सवर्कर्स’संदर्भात जास्त चर्चिली गेली तरीही नवतरुणींवर त्या विचारांचा परिणाम झालाच. ‘माय लाईफ, माय चॉईस’ असा मुद्दाही आला. बाजारवादाचे परिणाम या काळात स्वच्छ दिसू लागले होतेच. त्यातून तात्पुरते स्वार्थ वाढीस लागले, दूरगामी विचार अनावश्यक वाटू लागले आणि चांगल्या अर्थाचे स्वार्थदेखील मोठे – दीर्घकालीन पाहावेत हे व्यवहारभान शून्य झालं. यातून शारीरिक आणि मानसिक ताणतणावाला त्या सामोऱ्या जाऊ लागल्या. ताण कमी करण्याचे मार्ग पुन्हा बाजारच ठरवत होता, त्यालाही बळी पडू लागल्या. एखादं काम करून घेण्यासाठी पैसे खाऊ घालणं, एखादी महागडी भेटवस्तू लाच म्हणून देणं यात कुणा स्त्रीपुरुषांना काही गैर वाटेनासं झालं; त्याचप्रमाणे शैक्षणिक लाभ, विशिष्ट पदं वा पदोन्नती, पुरस्कार, आर्थिक फायदे, भौतिक लाभ इत्यादी मिळवण्यासाठी आपण आपल्याच शरीराच्या पायघड्या हे लाभ देऊ करणाऱ्या एखाद्या पुरुषासमोर अंथरणं यातही काही गैर वाटेनासं झालं. कॉर्पोरेट जगापासून सुरू झालेलं हे लोण पाहतापाहता शिक्षण, कला, चित्रपट, राजकारण, साहित्य इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये सहजी पसरलं. असे संबंध ठेवताना तीन युक्तिवाद प्रामुख्याने केले जातात – १. ‘दोघांची मर्जी’ आहे, २. एड्ससारखे आजार होऊन नयेत वा गर्भधारणा होऊ नये म्हणून साधनं वापरून संभोग केला जातो, ३. यात कुणाचं शारीरिक, मानसिक, आर्थिक वगैरे नुकसान नाही... हा ‘जस्ट कॅज्युअल सेक्स’ आहे, त्यामुळे कुणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. यातलं कुणी विवाहित असेल, तर त्याच्या जोडीदाराचा जो पेच असेल तो ज्याचा त्यानं व जिचा तिनं सोडवावा. हे मुद्दे वरवर पाहिले, तर त्यात काही गैर आहे असं वाटणारही नाही. पण स्वार्थ बाजूला ठेवून तटस्थपणे विचार केला तर ध्यानात येईल की, जिथं प्रेम आहे, अगदी निखळ आकर्षण तरी आहे, तिथं स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी कसे संबंध ठेवावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो. मात्र हे काहीही नसताना 'अवांतर लाभासाठी' कुणी शरीर वापरत असेल, तर तो सामाजिक प्रश्न बनतो. कारण असे 'पर्याय' वापरत नसलेल्या बायकाही त्यामुळे गृहीत धरल्या जातात आणि एकूणच 'सगळ्या यशस्वी बायका या याच मार्गाने यशस्वी बनल्या असतील' असा अनेकांचा गैरसमज तयार होतो.याबाबत मत मांडताना सोनाली जोशी म्हणतात, “ज्यांना हा मार्ग घ्यायचा आहे त्यांना २० वर्षापूर्वी जे काही याबाबतीत करणे पुरेसे होते ते आता विशीत असलेल्यांना पुरेसे नाही असा अर्थ त्यामागे आहे. नजर मेली आहे आणि वृत्ती सोकावली आहे. लोकसंख्या, स्पर्धा आणि अपेक्षांचा रेटा, आसुरी गॉसिपिंग यांचाहा एकत्रित परिणाम असावा.” हे सगळं मनात आलं ते, देवीप्रसाद मिश्र यांच्या 'सेवादार' या कवितेवर हिंदीत चांगली 'घमासान' चर्चा सुरू आहे. त्या कवितेचा अनुवाद फेसबुकवर दिला आणि मराठीतही समांतर थोडी चर्चा झाली. हिंदीतल्या चर्चेचे मुद्दे तीनहोते : १. स्वयंसेवी संस्थांचं अर्थकारण, २. स्त्रियांनी आर्थिक फायदे वा पदोन्नतीसाठी स्वत:च्या शरीराचा 'वापर' करणे आणि ३. या कवितेचा चांगला वा वाईट दर्जा. मराठीतली चर्चा मात्र पहिल्या व तिसऱ्या मुद्द्याला बरीचशी बगल देऊन दुसऱ्या मुद्द्यावरच अडकून राहिली. अपवाद फक्त अरुंधती देवस्थळे यांच्या प्रतिक्रियेचा. विचार करण्यासाठी वाचकांचा प्राधान्यक्रम सहसा लैंगिकतेसंबंधित मुद्द्यांना असतो, हे पुन्हा एकदा दिसलं आणि काहीसा खेद वाटला. स्त्रियांविषयीच्या सर्व चर्चा केवळ स्त्रीवादाच्या परिघातच व्हायला हव्यात असं नाही. खरंतर स्त्रीवाद आता इतर देशांमध्ये जुना होऊन तिथं अनेक चांगल्या नव्या संकल्पना आल्या आहेत, ज्या स्त्रीवादाच्या मर्यादा आणि त्रुटी ओलांडून वास्तवाकडे कसं बघायचं हे सांगतात. अर्थात आम्हाला अजून स्त्रीवादच नीट अभ्यासण्याची गरज भासलेली नाही आणि स्त्रीमुक्तीच्या जशा मनमानी व्याख्या ७० च्या दशकात लोकांनी तयार केल्या होत्या, तशाच आज स्त्रीवादाच्याही सुमार व्याख्या केल्या जाताना दिसताहेत. नव्या पिढीला वाचनाची आवश्यकता वाटेनाशी झाली आहे. तरीही देवीप्रसाद मिश्र यांची ही कविता नव्या-जुन्या सर्वांनीच वेळ काढून वाचावी अशी आहे, ती आवर्जून वाचा. ००० सेवादार (मूळ कविता : देवीप्रसाद मिश्र, अनुवाद : कविता महाजन ) चालू वर्तमानकाळ सदरातील आधीचे ब्लॉग : चालू वर्तमानकाळ : 38. आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा... चालू वर्तमानकाळ : 37. वंचितांच्या यशाची शिखरं चालू वर्तमानकाळ : 36. अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं? चालू वर्तमानकाळ 35. त्या पळाल्या कशासाठी? चालू वर्तमानकाळ 34. बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे चालू वर्तमानकाळ : 33. अभ्यासकाचे जाणे! चालू वर्तमानकाळ : 32 आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली! चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो… चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब