जापनिज एनिमेशन मार्केट १४.८ टक्क्यांनी वाढलेय. २०२४ सालची एकूण कमाई ३.८४ त्रिलियन येन म्हणजेच २५.३ बिलियन डॉलर म्हणजेच आपले भारताततले दोन लाख १३ हजार ८६ कोटी रुपये. एनिमेशन इंडस्ट्रीसाठी हा आकडा म्हणजे एक रेकॉर्ड आहे. टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये असोसिएशन ऑफ जापनिज एनिमेशननं आपल्या रिपोर्टमधले काही महत्त्वाचे मुद्दे सादर केले. संपूर्ण रिपोर्ट हा पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये सादर होईल. २०२३ च्या तुलनेत ५०० बिलियन येन जास्तीची कमाई झाली आहे. आता जापनिज एनिमेशन इंडस्ट्रीनं जगातलं ५१ टक्के मार्केट क़ाबिज केलं आहे.
नेटफ्लिक्स आणि क्रंचीरोल सारख्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉमनी एनिमेशन इंडस्ट्रीत आपली पकड घट्ट केली आहे. गोडझिला मायनस वन (२०२३) आणि वन पीस (२०२३) सारख्या एनिमेशन फिल्म आणि टेलिसिरीज जगभरात पोचल्या. खासकरुन युरोप आणि अमेरिकन मार्केटमध्ये जापनिज एनिमेशन कंटेटनं जोरदार कमाई केली. यातून आता मर्चडायझिंग आणि लायसन्सिंगनं नवी इकोसिस्टम तयार झाली आहे. यामुळं जापनिज एनिमेशन कंपन्यांची बल्ले-बल्ले कमाई झाली आहे. जापनिज एनिमेशन कंटेटची आंतरराष्ट्रीय कमाई २६ टक्क्यांनी (१४.२७ बिलियन डॉलर्स) वाढली आहे. तर देशांतर्गंत कमाई ही २.८ टक्क्यांनी (१०.९८ बिलियन डॉलर्स) वाढली आहे. २०१९ नंतर जापनिज एनिमेशन कंटेंट मार्केट कमाईच्या बाबतीत जवळपास १५ टक्क्यांनी वाढलं आहे.
जपानिज एनिमेशन इंडस्ट्रीची पुढची वाटचाल दोन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पहिली एनिमे इंडस्ट्री मार्केट. इथं थेट ग्राहकांचा संबंध आहे. ग्राहकांचा विचार करुन एनिमेंची निर्मीती केली जातेय. यातून जगभरात लायसन्सिंगवर भर दिला जात आहे. दुसरा टप्पा म्हणजे एनिमे प्रोडक्शन मार्केट. याद्वारे स्टुडियोंची कमाई वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळं जापनिज एनिमेशन इंडस्ट्री ही जगात आपला जबदबा कायम राखेल यात शंका नाही.
या रिपोर्टमधले काही मुद्दे सादर करताना एआय (AI) वर ज़ोर देण्यात आला. जनरेटिव्ह एआयच्या नैतिक वापराची मागणी करण्यात आलीय. म्हणजे निर्मात्यांचे हक्क सुरक्षित करण्यात यावेत आणि कॉपीराईटवर कुठलीज तडजोड करण्यात येऊ नये. येत्या काळात एआय (AI) ची व्याप्ती वाढणार आहे. एनिमेशन इंडस्ट्री याला अपवाद नाही. सर्वकाही एआय (AI) मय होत असताना ज्यांनी संकल्पना मांडली, प्रत्यक्षात आणली आणि प्रेक्षकांपर्यंत पोचवली त्याच्यावर अन्याय होऊ नये, अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.
येत्या काळात म्हणजे २०३३ पर्यंत जापनिज एनिमेशन इंडस्ट्रीची कमाई 20 ट्रिलियन येन पर्यंत पोचवण्याता मानस आहें. 2025 मध्ये जापनिज एनिमेशन कंटेंटनं हॉलीवुडला हादरवलं आहे. जवळपास 28 अब्ज डॉलर्सची कमाई करण्यात आलीय. ही वाढ जवळपास 10 टक्क्यांची आहे. यातून एक गोष्ट साफ होते की भविष्यात जापनिज एनिमेशन इंडस्ट्रीचा कमाईचा ग्राफ चढताच राहणार आहे.