SRH vs MI, IPL 2025: बुधवारी झालेला हैदराबाद (Sunrisers Hyderabad) मुंबई (Mumbai Indians) सामन्यात मुंबई संघाने दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली... हैदराबाद संघाचे या स्पर्धेतील आव्हान जवजवळ संपल्यात जमा आहे.. पुढील सर्व सामने सरस धावगगतीवर जिंकणे हे अशक्यप्राय आहे. आणि जर ते झाले तर ते चमत्कार असेल..
नाणेफेक जिंकून मुंबई संघाने फलंदाजीस आमंत्रण दिले ते हैदराबाद संघाला ..हैदराबाद संघाची सलामीची जोडी जेव्हा अपयशी ठरते तेव्हा हैदराबाद संघ कोसळतो ...आणि काल सुद्धा तेच झाले..पहिल्या सहा षटकात त्यांनी 4 बळी गमावले..आणि धावा होत्या फक्त 24..अशा स्थितीतून तुम्हाला वर येणे कठीण असते...काल क्लासन एक सुंदर खेळी खेळून गेला..त्याने सर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले..अभिनव मनोहर सोबत 99 धावांची भागीदारी केली पण मुंबई संघासमोर त्या अपुऱ्या होत्या..त्यांच्या संपूर्ण डावात दुहेरी आकड्यांच्या भागीदारी फक्त 2 झाल्या यावरून हैदराबाद संघाची पडझड लक्ष्यात येते..
पहिल्या काही षटकांत हैदराबाद संघाचे दोन्ही सलामवीर अती महत्त्वकांक्षी वाटले...अर्थात त्या दोघांचा खेळ तसाच आहे ..पण काल परिस्थितीची मागणी वेगळी होती...त्या दोघांना बोल्ट ने स्वस्तात बाद केले..याच दरम्यान ईशान बाद झाला..आणि ईशान चे बाद होणे हे एका नव्या चर्चेला आमंत्रण देऊन गेले.. आय पी एल संपेपर्यंत ही चर्चा चालू राहील..चर्चेत पुन्हा एकदा दोस्ती येईल..अंबानींचा पैसा येईल..
झाले असे की, उजव्या यष्टीचा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ईशान ला पंच बाद देतात..पण प्रत्यक्षात अपिल कोणीच करीत नाही..पंचांचे बोट वर उचलले जाते..आणि ईशान बाद नसताना सुद्धा तंबूचा रस्ता पकडतो..ईशान कडे रिव्ह्यू असतो..आणि आपल्या बॅट ला चेंडू लागला आहे की नाही हे फलंदाजाला चांगले माहित असते.. जो चेंडू खरे तर वाईड असू शकला असता...ईशान ने पंचांकडे दाद का मागितली नाही..याची चर्चा कायम राहील..
सहाव्या विकेट साठी क्लासन आणि अभिनव मनोहर 99 धावांची भागीदारी करतात.. 44 चेंडूत 71 धावांच्या खेळीत त्याने मारलेले फटके तो वेगवान आणि स्पिन गोलंदाजी किती समर्थपणे खेळतो हे दाखवून दिले..हैदराबाद संघ कोसळत असताना सुद्धा त्याचा स्वतःचा स्ट्राईक रेट 161 इतका होता..त्याला अभिनव मनोहर ने छान साथ दिली.. बुमराह ला मारलेला एक एक्स्ट्रा कव्हर वरून षटकार त्याची फलंदाजीतील ताकद दाखवून देतो..
मुंबई संघ कडून बोल्ट आणि दीपक ने मिळून 38 धावत 6 बळी घेतले..20/20 क्रिकेट मधील ही विशेष गोष्ट आहे.. संपूर्ण स्पर्धेत तसा सूर न सापडलेला बोल्ट आज अत्यंत प्रभावी वाटला..त्याने पॉवर प्ले मध्ये उत्तम गोलंदाजी केली...आणि डेथ मध्ये स्विंगिंग यॉर्कर टाकून हैदराबाद संघाचे शेपूट वळवळणार नाही याची काळजी घेतली...
144 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुबई संघाकडून आज पुन्हा एकदा रोहित शर्मा ने उत्तम फलंदाजी केली.. त्याने विल जॅक सोबत 64 आणि सूर्यकुमार सोबत 63 धावांची भागीदारी करून सामना 16 व्या षटकात मुंबईचा केला..
तिसऱ्याच षटकात त्याने कमिन्स च्या एका स्लो ऑफ कटर वर डीप मिड विकेटवर षटकार खेचून आपण आज देखील फॉर्म मधेच आहोत याचे संकेत दिले..आणि लगेच चौथ्या षटकात त्याने जयदेव च्या एका लेन्थ स्लो बॉलवर एक्स्ट्रा कव्हर वरून षटकार खेचून त्याची खात्री दिली. ..आज त्याने सर्धेतील सलग दुसरे अर्धशतक साजरे केले..आज सूर्यकुमार यादव याने 19 चेंडूत 40 धावा केल्या.. आज सूर्यकुमार ने सलग 9 वेळा 20/20 मध्ये 25 किंवा त्याहून अधिक धावा केल्या..इतके सातत्य तो ठेवतो आहे..
स्पर्धेतील संथ सुरुवातीनंतर आज मुंबई संघ सलग चौथ्या विजयाने तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.. ही गोष्ट इतर संघाच्या दृष्टीने घातक आहे.. कारण मुंबई संघातील प्रत्येक मॅच विनर आता फॉर्म मध्ये परतत आहे.. दुसऱ्या बाजूने स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर असणारे चेन्नई आणि हैदराबाद संघ मुबई सोडून इतरांचे नुकसान करण्यास सज्ज आहेत..
त्या दोन्ही संघांकडे गमविण्यासारखे काहीच नाही... त्यामुळे ते कोणाची पार्टी खराब करतात हाच काय तो प्रश्न..