साऊथ अफ्रिकेत गेल्यानंतर पोर्ट एलिझाबेथला जायचा मोह झाला नाही तरच नवल. कारण बंदर म्हणून आता पोर्ट एलिझाबेथ प्रसिद्ध आहेच. पण त्यापलिकडे मस्त डॉल्फिन्स आणि व्हेल पाहायचे असतील तर इथली एक सागरी ट्रीप करायला हरकत नाही. या ट्रीपसाठी किमान चार तास काढून ठेवायला लागतील यात शंका नाही.

पोर्ट एलिझाबेथला विंडी सिटी म्हणतात. या शहराला मोठा किनारा लाभला आहे. बंदर म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. अत्यंत नेटकेपणा आणि स्वच्छता यामुळे हे बंदर मोहक आहे. डॉल्फिन आणि व्हेल पाहायचे असतील तर सकाळची वेळ निवडावी लागते. इथल्या बोटीतून ही सफर कमाल आनंद देते. निळाशार समुद्र आणि आत खोल होत जाणारं पाणी आणि वाऱ्यामुळे तयार होणाऱ्या लाटा हे दृश्य नयनरम्य असतं. या भागात साधारण ५० हजार डॉल्फिन आहेत. त्यामुळे आपल्याला ते दिसतात. कधी आपल्यासोबत शर्यत लावतात कधी आपले आडाखे चुकवतात. पण इथे डॉल्फिनच्या खूप जवळ जाता येत नाही. कारण मासे पाहायचे असतील तर पाण्यातलं किमान १०० मीटर्सचं अंतर तुम्हाला राखावं लागतं. वारं खूप असेल तर हे अतंर वाढतं. डॉल्फिनचा एरिया सोडून आणखी आत गेल्यानंतर नजरेला पडू शकतो तो व्हेल. त्याला नशीब लागतं. व्हेल दिसला तरी त्याचं शेपूट पाहाणं हे भाग्याचं मानलं जातं इथे. तीन तासांची डॉल्फिन, व्हेल भेट मनात साठवण्यासारखीच आहे.

स्वच्छतेचं भान

ही सागरी सफर करताना आपल्याला आठवत राहते ती मुंबई -अलिबाग फेरी बोट. कारण तिथेही अशाच बोटी असतात. तिथेही सीगल्स असतात. पण आपल्यासारखा कचरा तिथे होत नाही. तिथल्या पक्षांना काहीही खायला घातलं जात नाही. पाण्यात पर्यटकांनी कचरा करू नये म्हणून त्यांना बजावलं जातं. शिवाय पाण्यात काही कचरा असेल तर तो हे बोटवाले स्वत: उचलतात. मोठा, नाकलनीय कचरा असेल तर त्याची माहीती संबंधित पोलीस यंत्रणेला दिले जातात. ही बाब भारतीय म्हणून आपण लक्षात ध्यायला हवी.

 व्हिडीओ :