सिनेमेनिया : भाईजानचा 'ट्यूबलाईट' नक्कीच लख्ख प्रकाशणार!
शिशुपाल कदम, एबीपी माझा | 22 Jun 2017 10:51 PM (IST)
सलमान खानचं ईदशी एक अनोखं नाते आहे. 2009 पासून भाईजानच्या आयुष्यातल्या नव्या टप्प्याला सुरुवात झाली... सलमानचे सिनेमे चालण्यामागे अनेक मतमतांतर असू शकतात...पण नेमकी दोन कारणे जी सगळ्यांनाच पटतील ती म्हणजे त्याचे चित्रपट ईदलाच प्रदर्शित होतात...आणि दुसरे कारण त्यातील बहुतांश रिमेक असतात... सुलतानच्या बंपर यशानंतर सलमान परत एकदा ईदच्याच मुहूर्तावर आपल्या भेटीला येतो आहे. निमित्त आहे ते ट्यूबलाईट... ट्यूबलाईट देखिल सलमानच्या अनेक हीट चित्रपटांसारखाच रिमेक आहे.. अॅलेक्सझँड्रो गोमेझ यांच्या लिटल बॉय चित्रपटाचा रिमेक आहे ट्यूबलाईट...पण सलमान द हीट मशिनचा खरा प्रवास सुरु झाला तो 2009 साली.. वर्ष 2009 बॉलीवूडमध्ये गटांगळ्या खाणाऱ्या सलमान खान म्हणजेच भाईजानसाठी खुप महत्वाचं म्हणावं लागेल... अनोख्या डान्सच्या शैलीतून जगाला वेड लावणाऱ्या मास्टर प्रभूदेवानं सलमानसोबत वॉन्टेड सिनेमा केला आणि सलमानचा इंडस्ट्रीमधला पुनर्जन्म झाला... दक्षिणेतील स्टार महेश बाबूच्या पोकिरी सिनेमाचं झेरॉक्स कॉपी होता वॉन्टेड...तो ही 2009च्या ईदलाच प्रदर्शित झाला होता. पुढच्याच वर्षी म्हणजे 2010 च्या ईदला अभिनव कश्यपच्या दिग्दर्शनात सलमाननं दबंग रोल केला... दबंगनं आमीरच्या थ्री ईडियटनं रचलेले कमाईचे रेकॉर्ड्स तोडले....बरं दबंग इतका चालका की सलमाननं दबंगचा दुसरा पार्टही काढला... तेलगूचा रिमेक करुन इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करणाऱ्या सलमानच्या दबंगचं दोन भाषांमध्ये रिमेकदेखील केला.... 2011 ला सलमान पुन्हा एक रिमेक सिनेमा केला... नाव होतं.... बॉडीगार्ड.. यावर्षीच त्याच्या रेडी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता... पण पुन्हा एकदा ईदचा मुहूर्त साधत सलमानने मल्याळम बॉडीगार्डचा रिमेक केला...आणि देशात कमाईचे नवे विक्रम रचले... विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा सलमानचे सिनेमे पडले...तेव्हा तेव्हा सलमाननं रिमेकचा सहारा घेतला... 2012 ला सलमाननं दोन सिनेमे केले...एक था टायगरने आधीच बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडून नवे रचले होते...त्यानंतर सलग चौथ्या वर्षीदेखील ईदच्या मुहूर्तावर दबंग कमबॅक केला...भाईजानने दबंगचा दुसरा अंक ईदला रिलिज केला... त्यानं सलमानच्याच एक था टायगरचे कमाईचे रेकॉर्ड्स मोडीत काढले... एक वर्षाच्या विश्रांतीनंतर सलमानने मोठ्या पडद्यावर परत येण्यासाठी 2014 साली दोन सिनेमे केले दोन्ही तेलगू सिनेमांचे रिमेक होते...एक होता जय हो....आणि दुसरा होता किक.... किक चित्रपट याचवर्षी ईदला प्रदर्शित झाला... जय हो सिनेमा तेलगूच्या स्टालिन सिनेमाचा तर तेलगू किकचा हिंदी रिमेक होता सलमानचा किक.... या दोन्ही रिमेकनं सलमानला इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठ्या स्टार्सच्या यादीत नेवून ठेवलं... 2015 च्या दिवाळीत सलमान आणि राजश्री प्रोडक्शनच्या प्रेम रतन धन पायोनं बॉक्स ऑफिसवर कमाई केली...पण प्रेक्षकांना मात्र ती पसंत पडल्याचं पाहायला मिळालं नाही.. दक्षिण कोरियाच्या मस्कराड या सिनेमाचा रिमेक होता प्रेम रतन धन पायो... पण सलमान खरा प्रेक्षकांना आवडला तो बजरंगी भाईजान चित्रपटानेच...परत एकदा ईदचा मुहूर्त सलमाननं साधला आणि चित्रपट प्रदर्शित केला...बजरंगी भाईजानने बॉलीवूडच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला..... बाहुबलीनंतर सगळ्यात जास्त चर्चा ट्यूबलाईटची जरी होत असली तरी कमाई करण्याचे आव्हान सलमान समोर आहे हे नक्की, भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणारे दोन चित्रपट 2016 चा दंगल आणि यावर्षीचा बाहुबलीचा दुसरा अंक...बजरंगी भाईजान मधील बजरंगी सारखाचा साधाभोळा सलमान आपल्याला ट्यूबलाईटमध्येही पाहायला मिळणार आहे ट्युबलाईटच्या ट्रेलरमधून दिसून आले आहे...आपल्या भाईजानची पाकिस्तानातील रिटर्न जर्नी व्हाया चीन आपल्याला ट्युबलाईटमध्ये पाहायला मिळणार हे नक्की..बस सलमानच्या अशाच फिल्म्स येत राहो...आणि त्याच्या ट्युबलाईटला शुभेच्छा