रिबन… बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनचा सर्वसामान्यांच्या लाईफ स्टाईलवरचा आगामी सिनेमा, त्याचा ट्रेलर आज रिलीज झाला. कल्की नेहमीच विविध छटांच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देते.



कल्कीच्या  चित्रपटांमध्ये नेहमीच एक अनोखी कथा पाहायला मिळते. अशीच एक अनोखी कथा कल्की पुन्हा एकदा घेऊन येत आहे. सर्वसामान्य बॅचलर कपल ते मॅरिड कपलपर्यंतचा प्रवास आणि संघर्ष यात आपल्याला पाहायाला मिळण्याची शक्यता आहे.



रिबन चित्रपटामध्ये कल्कीसोबत वेब सीरीज फेम सुमित व्यासचीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिबनमध्ये लव्ह स्टोरी, नात्यांमधील सर्व गोष्टी घडत असतानाच त्यांना अडचणींचा सामना करताना एकमेकांची होणारी खरी ओळख यातून दाखवण्यात आली आहे.



सुमित व्यवसायाने इंजिनियरची भूमिका साकारली आहे. सुमित आणि कल्कीची केमिस्ट्री पाहता या दोघांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण होण्याची शक्यता आहे.



राखी शांडिल्य यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. 3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्की आणि मिकेश भैय्या म्हणजेच सुमित व्यासची जोडी पडद्यावर काय जादू करेल, हे लवकरच कळेल.

पाहा ट्रेलर :



सिनेमेनियातील याआधीचे ब्लॉग :

सिनेमेनिया : सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’

सिनेमेनिया : बोस डेड ऑर अलाईव्ह, उत्तर मिळणार?

सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग

सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर ‘बादशाहो’

सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?