सध्या देशात सगळ्यात जास्त वादाच्या भोवऱ्या अडकलेला चित्रपट आहे ‘इंदू सरकार’. चित्रपटाच्या नावातच आपल्याला कथानकाची ओळख होते. ‘इंदू सरकार’चा ट्रेलर रिलीज झाला आणि देशातील राजकारणात आणखी एक वादाचा विषय मिळाला.




प्रथम दर्शनी ट्रेलर पूर्णपणे काँग्रेसविरोधी वा तत्कालीन इंदिरा गांधी सरकारविरोधी असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा होती आणीबाणी आणि ‘इंदू सरकार’मध्ये आणीबाणीच्या दिवसातील बऱ्याच घटना आणि प्रसंग पाहायला मिळणार याचा अंदाज ट्रेलरमधून येतो.



आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य जनतेने सोसलेल्या यातना किती भयानक असतील, हे हा ट्रेलर पाहिल्यावर अंदाज येतो. 1975 चा काळ आपल्या डोळ्यासमोर आणण्याचं आव्हान दिग्दर्शक मधुर भांडारकरने पेललं आहे. ट्रेलरमध्ये अमिन सयानींच्या आवाजही आपल्याला ऐकायला मिळतो.



अभिनेत्री क्रिती कुल्हारी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तिच्याबरोबर नील नितीन मुकेशही आपल्या कारकीर्दीतील खुप महत्वाची भुमिका साकारतो आहे. चित्रपटात नील ‘संजय गांधी’च्या भूमिकेत आहे. क्रिती कुल्हारी आणि नील नितीन मुकेशसोबतच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, इंदिरा गांधींच्या भूमिकेत मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया विनोदसुद्धा दिसणार आहेत.



ट्रेलरमध्ये संजय गांधी आणि त्यांनी काढलेला नसबंदीचा आदेश आणि त्याचा देशावर झालेला दूरगामी परिणाम, याची झलकही दिसेल. गोळीबार, लाठीहल्ला, पोलिस, सरकारी अधिकाऱ्यांचा माज आणि अत्याचार आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतो.

या सगळ्या आत्याचाराला कंटाळून परिस्थितीशी झुंज देणारी एक महिला आणि तिच्यासोबत संजय गांधी आणि इंदिरांचं राज्यशासन यावर ‘इंदू सरकार’ आधारित असल्याचं नक्की कळते. येत्या 28 जुलैला ‘इंदू सरकार’ प्रदर्शित होणार आहे.



ट्रेलरमध्ये तरी एक-दोन डायलॉग सोडले, तर बाकी डायलॉग्समध्ये काही दम दिसला नाही. पण हा संजय गांधींचा म्हणजेच नील नितीन मुकेशचा एक डायलॉग आहे, जो आजही परफेक्ट बसतोय. 1975 मध्ये काँग्रेस आणि गांधी या नावांचं महत्व बदललं होते... तसंच आजही आहे...

तो डायलॉग आहे, ‘अब इस देश में गांधी के मायने बदल चुके हैं’

संपूर्ण ट्रेलर :