आईच्या उदराचा स्वर्ग सोडून जगात येतानाही
'कदाचित' जे रितेपण मनाला वाटलं असेल,
तेच रितेपण पुढं कोणतीही मोठी गोष्ट संपताना कायम टिकलं,
चौथीची परीक्षा संपल्यावर, रमत गमत घरी येताना, पेन पेन्सिल, खोडरबर सगळं दोनदा आठवनीने सोबत घेतलं असतानाही... मागे बघत "काहीतरी आपण परीक्षा हॉल मधेच विसरलोय" अशी घरी पोचेपर्यंत मनात आलेली भावना...
दहावीच्या निरोप समारंभानंतरच्या गोंगाटातही ह्रदयाची झालेली एकलकोंडी घालमेल...
दहावीच्या शेवटच्या पेपरनंतर एकूणच शरीरात तयार झालेली निर्वात पोकळी, त्यात भिरभिरणाऱ्या असंख्य भावना...
बारावीच्या शेवटी काढलेल्या ग्रुप फोटोनंतर, आयुष्याचं एक पर्व संपल्याची आलेली unsatisfying फीलिंग...
दहावी, बारावी, इंजिनीअरिंगमधल्या शेवटच्या गॅदरिंगनंतर डोळ्यांनी एकट्यात केलेला प्रचंड ओक्साबोक्सीपणा,
इंजिनीअरिंगच्या शेवटच्या पेपरनंतर अंगावरचा शर्ट फाडतानाच्या आनंदात-कुठंतरी लपलेलं ईवलंसं प्रचंड दुःख.
आयुष्यातला पहिला जॉब सोडताना लास्ट डे ला, घरी जाताना भयान संध्याकाळच्या गर्दीत रोडवर फुटपाथ वरनं चालताना, डोळ्यात डोकावलेले दोन थेंब,
भावा, बहिणी, जवळच्या मित्र मैत्रिणीच्या, लग्नात 10 दिवस-रात्र केलेली प्रचंड धावपळ अन् लग्न झाल्यावर सगळे निघून गेल्यावर सुन्या झाल्या मंडपाच्या झालरीसारखं एकट्यात फडफडणारं मन...
स्वतः पुढाकार घेऊन पार पाडलेल्या एका मोठ्या यशस्वी समारंभानंतर ह्रदयात निर्माण झालेला डोंगराएव्हढा पोकळपणा......
हे सगळेच्या सगळे आनंदाचे क्षण असूनही, शेवटी सगळं संपल्यानंतर मात्र जोराजोरात भिरभिरणारं मन तेव्हा e=mc2 मधल्या m इतकं न मोजता येण्याऐवढं अवजड होतंच होतं...
अगदी तसंच गेले 45 दिवस जी गावं स्पर्धेत अहोरात्र झटली, ज्या 7 लाखाच्या वर लोकांनी आपलं घरदार सोडून श्रमदानाच्या ठिकाणालाच आपल्या घराचा उंबरा बनवलं, ती स्पर्धा काल रात्री "बाराच्या ठोक्याला" संपली, तेव्हा इतकी वर्ष लयीत एकापाठोमाग एक चाललेल्या ह्रदयाच्या करोडो ठोक्यांपैकी "एक ठोका" मात्र नकळत चुकलाच...
पण हेही तितकंच खरंय की लयीतल्या या करोडो ठोक्यांपेक्षा ,सगळ्यांच्या आयुष्यभर सोबत अन् लक्षात राहिल तो हाच एक 'चुकलेला" ठोका...
अनेक ठिकाणी थंड वारा न लागताही, कित्येकांच्या डोळ्यातला काही थेंब पाऊस, या गरम तापल्या जमिनीवर पडलाच पडला..............
एक रुपयाही कोणाला न देता, असा पाऊस पाहायचं भाग्य ज्या पानी फाऊंडेशन चळवळीला लाभलं-- त्याचं खरंच अभिनंदन...
सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग :
अपयशावरचा पहिला घाव..!!
धमन्या पेटलेले 40 सैनिक...
जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी
श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई
सलाम दोस्तहो...
...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!
द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख
काल रात्री बाराचा पाऊस...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2018 10:35 AM (IST)
ती स्पर्धा काल रात्री "बाराच्या ठोक्याला" संपली, तेव्हा इतकी वर्ष लयीत एकापाठोमाग एक चाललेल्या ह्रदयाच्या करोडो ठोक्यांपैकी "एक ठोका" मात्र नकळत चुकलाच...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -