आज झालेल्या चेन्नई विरुद्ध कलकत्ता सामन्यामध्ये चेन्नई एक्सप्रेस नावापुरतीच एक्सप्रेस राहिली.....सुरुवातीपासून  कलकत्ता संघाने चेन्नई एक्सप्रेस ला ब्रेक लावला तो अगदी शेवटपर्यंत..
आज नाणेफेक जिंकून कलकत्ता संघाने प्रथम क्षेत्र रक्षण  स्वीकारले आणि प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले ते चेन्नई संघाला...आज चेन्नई संघाचा कर्णधार  धोनी होता..त्यामुळे आज त्यांचे नशीब बदलेल असे चाहत्यांना वाटले पण प्रत्यक्षात त्यांनी  सर्वात कमी धावसंख्येचा आकडा गाठला....
चेन्नई ची सुरुवात फार निराशाजनक झाली..मोईन अली च्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप खेळत असताना कॉन्वे पायचीत सापडला...आणि लगेचच हर्षित राणा च्या गोलंदाजीवर रचिन बाद  झाला...त्यानंतर वरुण आणि सुनील यांच्या गोलंदाजीचे कोडे चेन्नई चे फलंदाज सोडवू शकले नाहीत...त्यांच्या डावात सगळ्यात मोठी भागीदारी होती ती  ४३ धावांची आणि ती केली होती विजय शंकर आणि राहुल त्रिपाठी यांनी..
डावाच्या १८ व्या षटकात जो शिवम दुबे याने चौकार मारला तो ६३ चेंडू नंतर आला...यावरून ते किती मंदगतीने खेळत होते याचा अंदाज येतो...शिवम दुबे च्या ३१ धावा चेन्नई ला शंभरच्या पुढे घेऊन गेल्या...
१०४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या कलकत्ता संघाची सुरुवात आक्रमक झाली..
डीकॉक आणि नारायण यांनी २६ चेंडूत ४६ धावांची सलामी दिली..त्यात डीकॉक ने २३ धावा केल्या आणि त्यात त्याचे ३ षटकार होते...
सुनील नारायण आज चेन्नई च्या गोलंदाजीवर तुटून पडला त्याने १८ चेंडूत ४४ धावा केल्या आणि त्यात त्याने ५ षटकार लागविले..पहिल्या ६ षटकात  ७१ धावा धावफलकावर लावल्यावर विजयाची फक्त औपचारिकता उरली....आल्या आल्या अजिंक्य रहाणेने खाते उघडताना जो स्टेट ड्राईव्ह मारला तो प्रेक्षणीय होता...आणि त्या नंतर त्याने मारलेला फ्लिक चा षटकार मारला तो अजिंक्य काय क्लास कॅरी करतो हे दाखवित होता..

Continues below advertisement


कलकत्ता संघाकडून आज पुन्हा एकदा सुनील नारायण ने मॅच विनर परफॉर्मन्स दिला ..४ षटकात १३ धावा आणि ३ बळी आणि ४४ धावा यावरून तो कलकत्ता संघासाठी किती मोठी  ताकद आहे हे दर्शवितो..
आजच्या विजयाने पुन्हा एकदा कलकत्ता संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर गेला..आज अजिंक्य रहाणेने त्याच्या गोलंदाजांचा केलेला वापर तो कर्णधार म्हणून किती हुशार आहे...आणि कलकत्ता संघाने कर्णधार पदासाठी त्याच्याकडे पाहणे किती योग्य आहे हे सिद्ध होते..
मोईन अली याला पॉवर प्ले मध्ये आणणे...दीपक हुडा साठी वरुण ला घेऊन येणे इथे त्याचा गृहपाठ दिसून येतो..आणि ज्यांचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत त्यांनी गृहपाठ न करणे त्यांना परवडणारे नाही..कारण पंडित गुरुजी हे शिस्तप्रिय शिक्षक म्हणून क्रिकेट जगतात लोकप्रिय आहेत...
आजची चेन्नई एक्सप्रेस लोकल ट्रेन पेक्षा हळू धावली...स्पर्धा मध्यावर आली असताना त्यांच्या वेगाची प्रतीक्षा चाहत्यांना आहे..त्यांचा पुढील सामना बलाढ्य लखनौ विरुद्ध आहे..तिथे फॉर्म मध्ये असलेले लखनौ चे नवाब त्यांची वाट पाहत असतील..