द आदिवासी विल नॉट डान्स’ हा हांसदा सोवेंद्र शेखर यांचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह आहे. त्या आधीचं त्यांचं पहिलं पुस्तक होतं : ‘द मिस्टीरियस एलमेंट ऑफ रूपा बास्की.’ संथाळ या आदिवासी जमातीत जन्मलेल्या आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या लेखकाने आपलं पहिलंवहिलं लेखन या समाजातील आपल्या आठवणी, अनुभव यांचा आधार घेऊन करावं हे स्वाभाविक होतंच. या पुस्तकाची चांगली चर्चा झाली. इतर भाषांमध्ये त्याचे अनुवाद सुरू झाले.
अस्सल लेखक ही काही क्षणांपुरतं का होईना, पण दुसऱ्या देहापासून ते दुसऱ्या दुनियेपर्यंत कशाच्या पोटात शिरू शकणारी चमत्कारी व्यक्ती असते. अगदी आपल्याच अनुभवापुरतं लिहायचं म्हटलं तरी, या ‘व्यक्तिगत अनुभवा’त इतर माणसं सावल्यांसारखी का होईना पण असतातच. लेखक नसलेले लोकही काही प्रमाणात का होईना, पण दुसऱ्याचं मन, स्वभाव, वृत्ती ओळखून ती व्यक्ती कसं वागेल, काय बोलेल याचा अदमास घेऊन त्या व्यक्तीशी संवाद साधत असतात आणि असं ज्यांना जमत नाही, त्यांना ‘माणसं कळत नाहीत’, असं म्हटलं जातं. त्या अर्थी अनेकानेक वृत्तींची माणसं जाणून घेत शब्दबद्ध करणाऱ्याला लेखक म्हणता येईल. जे आपण नाही आहोत, त्याच्या देहामनात शिरून त्यांचं वास्तव व त्यांची स्वप्नं रंगवण्याचं काम लेखक करतात; त्यामुळे जात-धर्मभेद, लिंगभेद, वर्ण-वर्गभेद, वय-शिक्षणभेद आदी ओलांडून जाणं त्यांच्यासाठी अपरिहार्य असतं. एखादा पुरुष त्यामुळेच एखादं स्त्रीपात्र जिवंत उभं करू शकतो, एका धर्माची व्यक्ती दुसऱ्या धर्मातल्या एखाद्या विशिष्ट जातीच्या समूहाचं चित्रण करू शकते, किंवा एखादी स्त्री एखाद्या हिजड्याची मानसिकता रंगवू शकते. असं काहीही न करता केवळ आपल्या अनुभवापुरतं लिहायचं तर अगणित गोष्टींवर लेखक कधीच लिहू शकणार नाही. एखादा गंभीर आजार, एखादा अपघाती मृत्यू, एखादा जीव जन्माला घालणं अशा रोज कुठे ना कुठे दिसणाऱ्या गोष्टींचे अनुभव परिचित असले, तरी ते प्रत्येकाने घेतलेले असणं अशक्य. पण हे ‘दुसऱ्यां’चं जग मांडणं वरचेवर अवघड होत चाललेलं आहे. भेद मानत नाही, असे दिखावे करणारे लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी याच भेदांना जोपासत कसे फायदे करून घेताहेत ते उघड दिसू लागलं आहे. हांसदा सोवेंद्र शेखरसारखे तरुण लेखक या कचाट्यात सापडतात. तेव्हा लेखन आणि लेखन विषयाचं चिंतन बाजूला ठेवून त्यांना आपल्या आधीच्या लेखनाविषयी खुलासे, स्पष्टीकरणं करण्यात आणि कायदेशीर लढाया लढण्यात वेळ दवडावा लागतो आहे. हे अजिबातच चांगलं लक्षण नाहीये. ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ हा हांसदा सोवेंद्र शेखर यांचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह आहे. त्या आधीचं त्यांचं पहिलं पुस्तक होतं : ‘द मिस्टीरियस एलमेंट ऑफ रूपा बास्की.’ संथाळ या आदिवासी जमातीत जन्मलेल्या आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या लेखकाने आपलं पहिलंवहिलं लेखन या समाजातील आपल्या आठवणी, अनुभव यांचा आधार घेऊन करावं हे स्वाभाविक होतंच. या पुस्तकाची चांगली चर्चा झाली. इतर भाषांमध्ये त्याचे अनुवाद सुरू झाले. लेखक आपल्या पुढच्या लेखनाकडे वळला आणि काही लोकांना एकाएकी साक्षात्कार झाला की, या कथांमध्ये संथाळी समाजाचं जे चित्रण आहे. त्यातही खासकरून संथाळी स्त्रियांचं, ते विकृत आहे. त्यातले स्त्रियांच्या लैंगिक समस्या पोर्नोग्राफिक पद्धतीने रंगवून, मजा घेत लिहिलेल्या आहेत; त्यांच्या शोषणाचं वर्णन कुणीही वाचून उत्तेजित व्हावं अशा पद्धतीने सविस्तर केलेलं आहे. आणि त्यामुळे हे लेखन अश्लील आहे. या कथांमुळे संथाळी स्त्रियांची एकूण भारतीय समाजातील प्रतिमा खराब बनते आहे. म्हणून या पुस्तकावर बंदी घातली गेली पाहिजे. गेली दीड-दोन वर्षं त्यावर गदारोळ सुरू होता. दुसऱ्या बाजूने संथाळी समाजातल्याच काही सुशिक्षित लोकांनी घडवून आणलेला हा उठाव प्रायोजित आहे का, यावरही चर्चा सुरू झाल्या आणि लेखनस्वातंत्र्य नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही याविषयी देखील बोललं जाऊ लागलं. लोकांनी मोर्चे काढले आणि हांसदा सोवेंद्र शेखर यांचे पुतळे चौकाचौकात जाळले. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. झारखंड सरकारनं या पुस्तकावर बंदी घातली आणि पुस्तकाच्या सर्व उपलब्ध प्रती जप्त करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य केंद्रात चिकित्सा अधिकारी या पदावर लेखक काम करत होते; तिथून त्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि अनेक खोटेनाटे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. हे पुस्तक लिहिण्याआधी त्यांनी राज्य सरकारची परवानगी घ्यायला हवी होती, असंही म्हटलं गेलं. हांसदा सोवेंद्र शेखर यांनी पुस्तकात कोणतेही बदल करण्यास नकार दिला आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ते ठाम राहिले. हा धुरळा खाली बसायला चार महिने लागले. आदिवासी समाजाचे काही अभ्यासक, जाणकार आणि काही लेखक यांच्या समितीने हे पुस्तक अभ्यासलं, तपासलं. सरकारला त्याविषयी रिपोर्ट लिहून दिला, तो 12 डिसेंबर 2017 रोजी विधानसभेत चर्चिला गेला. या पुस्तकात काहीही ‘गैर’ नसल्याचं जाहीर करण्यात आलं आणि पुस्तकावरील बंदी मागे घेण्यात आली. त्याविषयी हा लेखक शांतपणे म्हणतो, ‘पुस्तकावर अकारण असे वादंग निर्माण करणं ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. मी स्त्रियांचं चुकीचं चित्रण केलंय, असं म्हणणारे लोक खरोखरच स्त्रियांचा आदर करणारे आहेत का, हे कोण पाहणार? माझ्या पुस्तकामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असं म्हणणं तर अगदीच हास्यास्पद आहे; एखाद्या साध्या कथासंग्रहामुळे खरोखरच परिस्थिती इतकी बिघडू शकते का? जाळपोळ करणारे हिंसक लोक आणि ऑनलाईन हिंसा करणारे ट्रोल हे मला अजून, अधिक, सातत्याने लिहिण्यासाठी प्रोत्साहनच देताहेत असं मी समजतो. माझं चारित्र्य कसं आहे याची चर्चा सोशल मीडियावर करणाऱ्या लोकांचंच चारित्र्य या चर्चेतून स्पष्ट दिसतंय. मला धमक्या देणारे लोक हे केवळ कागदी वाघ आहेत. मला जितका विरोध केला जाईल, तितका मी अधिकाधिक लेखन करण्यासाठी प्रेरितच होईन.लेखक स्वत: ज्या जमातीतला आहे, त्याच जमातीच्या चित्रणावरून जर इतका गदारोळ होऊ शकतो; तर तो दुसऱ्या एखाद्या जातीजमातीचा वा वेगळ्या धर्माचा असता तर वाद अजून किती उफाळला असता याची कल्पनाही करवत नाही. कांचा इलैय्या यांच्या पुस्तकावरील बंदी उठवतेवेळी न्यायाधीश म्हणाले होते, ‘आम्ही इथं पुस्तकांवर बंदी घालण्यासाठी बसलेले नाही आहोत. एखादं पुस्तक केवळ वादग्रस्त आहे म्हणून त्यावर बंदी घातली जावी, असं म्हणता येणार नाही. आम्ही फार तर एखाद्या लेखकाला संयमित लिहा, असं सुचवू शकतो; पण त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणू शकत नाही. ‘आमच्या जातिधर्माविषयी दुसऱ्यांनी लिहू नये; आमच्या जातीच्या आदर्श नेतृत्वाविषयी चांगलं देखील लिहू नये, कारण असं करून तुम्ही त्याला ‘आमचं’ ठेवत नाही, तुमचं बनवण्यासाठी त्याला किडनॅप करता, त्याच्यावर लिहिण्या-बोलण्याचा हक्क फक्त आमचा आहे; तुम्ही तुमचं बायकांचं काय ते लिहा, पुरुषांविषयी कशाला तारे तोडता; आपल्याच जातिधर्माच्या विरोधात लिहिताय म्हणजे तुम्ही राष्ट्रद्रोही आहात... अशी अनेकानेक वाक्यं आजकाल सोशल मीडियावर वाचायला मिळताहेत. समाजात वैविध्य आहे, भेदभावही आहेत आणि हे वास्तव नाकारण्याचं काही कारणही नाहीये. मात्र, ते जोपासावेत, वाढवावेत अशी विधानं, अशा शाब्दिक कृती समंजस म्हणवणारे, बुद्धीजीवी लोक देखील करू लागतात आणि हांसदा सोवेंद्र शेखरसारख्या लेखकाला व अशा अजूनही काही लोकांना ट्रोल करतात, तेव्हा खेद वाटतो, वाढतो. नासमज लोकांना एकवेळ समजावता येतं, पण समजदार लोकांची स्वार्थी झापडं कशी दूर करणार? संबंधित ब्लॉगचालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्यचालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरेचालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्टचालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षंचालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो... चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्याचालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकंचालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शनचालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसंचालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नरचालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगडचालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडेचालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरंचालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातंचालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्याचालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पतचालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब