BLOG POST: काल झालेल्या हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्यात हैदराबाद संघाच्या अभिषेक शर्माच्या अंगात हनुमानाचे बळ होते की काय अशी शंका यावी असा खेळ त्याने केला.

Continues below advertisement

पंजाब संघाने उभारलेल्या २४५ धावांच्या सूर्याकडे झेपावताना या अभिषेक नावाच्या साहसी वीराने मोठ्या ध्येयवाद ठेवून आपल्या संघासाठी एक अशी खेळी केली की इतिहासात त्याचे नाव लिहिले गेले..

"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

Continues below advertisement

कुसुमाग्रज यांनी लिहिलेले कोलंबस चे गर्व गीत आज आपला साथी हेड च्या साह्याने हैदराबाद मध्ये गायले...नव्या जगाच्या शोधात निघालेल्या कोलंबस आणि अभिषेक शर्मा या दोघांमधील उर्मी एकच होती आणि ती होती आपल्यातील उर्मी सह नवे क्षितिज गाठण्याची..

काल  पहिल्या चेंडूपासून  हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमणास सुरुवात केली...अर्थात २४६ धावा हव्या असताना तुम्हाला आक्रमणाशिवाय पर्याय देखील नसतो..पण हे आक्रमण करीत असताना तुमच्या पारड्यात नशिबाचे दान सुद्धा लागते...अभिषेक शर्मा आणि हैदराबाद संघ या दोघांच्या सुदैवाने ते दान वारंवार पडले...प्रसिद्ध गोल्फर गॅरी प्लेअर यांचे एक सुंदर वाक्य आहे

The harder you work ,the luckier you get

या ओळीचा वेळोवेळी कालच्या अभिषेक च्या खेळीत प्रत्यय आला..दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कव्हर वरून खेळत असताना चेंडू स्टोइनिस च्या बोटांना स्पर्श करून गेला...त्यानंतर चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अभिषेक झेल बाद होता पण तो नो बॉल होता..चहल च्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर उंच उडालेला झेल चहल ला घेता आला नाही...ही त्याला मिळालेली जीवदान होती..त्यानंतर त्याचे कित्येक फटके बॅट ची कड घेऊन सीमापार गेले...पण आज अभिषेक च्या डोक्यावर पवनपुत्र हनुमंताचा आशीर्वाद होताच कारण त्याने मारलेले दहा षटकार कोणत्याही अडथळ्याशिवाय हवाईमार्गे प्रेक्षकांत जाऊन पडले..तो लोफ्टेड ड्राईव्ह ने ऑफ साइडला षटकार मारतो..चेंडू कट करून पॉइंट वरून षटकार मारतो...आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल करून त्याचे गुरू युवराज सिंग सारखे काऊ कॉर्नर वरून सिक्स मारतो... गोलंदाजांच्या डोक्यावरून उंच उंच लढवू हे गाणे गात षटकार मारतो..आणि आज तर त्याने मार्को जॉन्सन च्या गोलंदाजीवर त्याच्या ऑफ स्टम्प च्या बऱ्याच बाहेर असलेल्या चेंडूवर फाइन लेगवरून षटकार खेचला..हे सर्व करीत असताना जणू काही गोलंदाज कुठे गोलंदाजी करणार आहे हे त्याच्या कानांत आधीच सांगतो अशा प्रकारे त्याचे पदलालित्य होत असे..आज त्याने ५५ चेंडूत १४१ धावांची खेळी केली आणि ती आय पी एल मधील तिसऱ्या क्रमांकाची खेळी ठरली. त्याच्यापुढे ख्रिस गेल आणि मॅक्युलम हे दोघे आहेत.. आज त्याच्या या खेळीत त्याला त्याचा जोडीदार हेड ने उत्तम साथ दिली .हैदराबाद संघाकडून त्यांनी १७१ धावांची सलामी दिली..!त्यात हेड ३७ चेंडूत ६६ धावा ..त्याने मारलेले पुल चे फटके ज्यामधे  ताकद होती ते सुद्धा दर्शनीय होते.)  हासुद्धा एक इतिहास होता..इतके मोठे आव्हान त्यांनी ९ चेंडू राखून पूर्ण केले यामध्येच या दोघांच्या खेळीतील परिणामकारकता दिसून येते... नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय श्रेयस ने घेऊन तो स्वतःच्या खेळीने सार्थ देखील ठरविला...त्याच्या ३६ चेंडूत ८२ धावा त्यात ६ चौकार आणि ६ षटकार होते...त्याला सुरुवातीला प्रभसिमरण, प्रियांश आणि नंतर स्टोइनस ने साथ देऊन धावांचा डोंगर उभारला..पण आज अभिषेक शर्मा जग जिंकायला निघालेला सिकंदर होता..आणि 

हार नहीं मानूंगारार नई ठानूंगा,काल के कपाल पे लिखता मिटाता हूंगीत नया गाता हूं..

ही अटलजी वाजपेयी यांची कविता तो  गात होता आणि नवीन गीत हैदराबाद संघासाठी लिहित होता..

निष्पाप चेहऱ्याची संघ मालकीण काव्या मारण हिच्या चेहऱ्यावर बऱ्याच कालावधीनंतर निरागस हसू आणण्यासाठी आजचा दिवस अभिषेकचा होता. ..श्रेयस ने निराश होण्याचे कारण नाही.. कारण उद्याचा दिवस श्रेयसचा देखील असू शकतो कारण त्याची संघ मालकीण सुद्धा निरागस चेहऱ्याची आहे..