Continues below advertisement


लहानपणीचे 'असावा सुंदर चॅाकलेटचा बंगला..' हे बडबडगीत तुम्हाला आठवतचं असेल. चॅाकलेट खायला आवडत नाही, असे बोलणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॅाकलेट आवडतात. यात आज आंतरराष्ट्रीय चॅाकलेट दिनाच्या निमित्ताने आपण जगभरातील सर्वात महाग अन् चविष्ट चॅाकलेट्स बद्दल जाणून घेणार आहोत...


जगातील ही सर्वात महाग चॅाकलेट्स दुर्मिळ प्रकारच्या कोको बियानांपासून बनवले जातात, जे त्यांच्या अप्रतिम चवासाठी आणि विविध आकारांच्या शैली तसेच सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.


टोआक चॅाकलेट


टोआक चॅाकलेट ही इक्वेडोर स्थित चॅाकलेट उत्पादक कंपनी आहे. हे चॅाकलेट नॅशिओनल नावाच्या कोको बियांपासून बनवले जाते. विशेष म्हणजे या चॅाकलेट बारची ठेवण अशी की याच्या मध्यभागी एक भाजलेले कोको बियाणे ठेवले जाते. या बारच्या 18 तुकड्यांमध्ये येणार्‍या या चॅाकलेट बॅाक्सची किंमत 68 अमेरिकन डॅालर्स म्हणजे सुमारे 5,846 रुपये आहे.


अमेदेई पोर्सिलाना


अमेदेई ही इटली स्थित जगप्रसिद्ध चॅाकलेट उत्पादक कंपनी आहे. हे चॅाकलेट पोर्सेलाना या कोको बियाण्याला जगातील सर्वात दुर्मिळ प्रजातीच्या कोको बियाण्यांमध्ये गणले जाते. या एका चॅाकलेट बारची किंमत 27.99 अमेरिकन डॅालर्स आहे.


निप्सचिल्डची चोकोपोलॅाजी- ला मॅडलिनट्रफल


निप्सचिल्ड चॉकलेटियर या युनायटेड स्टेट्‍स स्थित कंपनीचे निप्सचिल्डची चोकोपोलॅाजी हे चॅाकलेट जगभरातील सर्वात महागड्या चॅाकलेट मध्ये गणले जाते. विशेष म्हणजे या चॅाकलेटची प्रत्येक कलाकृती हाताने बनवली जाते. यामध्ये 71% सिंगल बीन डार्क चॅाकलेटचा वापर केला जातो. याच्या सर्वसाधारण बारची किंमत 34 अमेरिकन डॅालर्स आहे.


फेव्ह चॅाकलेट- 100% कोकोआ बार


फेव्ह चॅाकलेट ही सॅन फ्रान्सिस्को स्थित आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. 2007 सालापासून सुरुवात केलेल्या फेव्ह चॅाकलेटच्या, सर्वसाधारण 9 तुकड्यांच्या डोम कलेक्शनची किंमत 29 अमेरिकन डॅालर्स एवढी आहे.


शार्फेन बर्जर


शार्फेन बर्जर हे चॅाकलेट म्हणजे अमेरिकेतील पहिल्या क्राफ्ट चॅाकलेट कंपनीची कलाकृती आहे. हे चॅाकलेट त्यामध्ये वापरण्यात येणार्‍या उच्च प्रतिच्या घटकांसाठी प्रसिद्ध आहे. या चॅाकलेटच्या एका बॅाक्सची किंमत जवळपास 35 अमेरिकन डॅालर्स आहे.


पियरे मार्कोलिनी-ग्रॅँट क्रू चॅाकलेट


या बेल्जियम स्थित चॅाकलेट उत्पादक कंपनीची सुरुवात पियरे मार्कोलिनी नावाच्या उत्पादकाद्वारे केली गेली. ही कंपनी जभरातील कोकोच्या मळ्यांमधून कोको बियाणे निर्यात करते. हे चॅाकलेट त्याच्या बीन टू बार पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. या चॅाकलेटच्या सर्वसाधारण बारची किंमत 17 अमेरिकन डॅालर्स एवढी आहे.


रिचुअल चॅाकलेट- बोर्बन बॅरल एज्ड बार


या जगप्रसिद्ध चॅाकलेटची विशेषता म्हणजे हे बोर्बन व्हिस्की बॅरलमध्ये निर्माण केले जाते. ही एक युनायटेड स्टेटस् स्थित चॅाकलेट कंपनी असून याच्या सर्वसाधारण चॅाकलेट बारची किंमत 25 अमेरिकन डॅालर्स एवढी आहे.