विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांनी जगाला ट्रॅजेडी किंवा शोकांतिका दिली. या शोकांतिकांमधून शेक्सपिअरने नातेसंबधांचा गुंता उलगडा. मग ते मॅकबेथ असो किंवा हॅम्लेट. टू बी ऑर नॉट टू बी या हॅम्लेटच्या संवादाची भुरळ आज ही प्रेक्षकांना पडली आहे. नात्यांच्या विळख्यात अडकलेल्या डेन्मार्कच्या राजकुमाराची ही शोकांतिका शेक्सपिअरने १६०२ च्या आसपास लिहिली. त्यापुर्वी त्याचा ११ वर्षांचा मुलगा हॅम्नेटचा प्लेगनं मृत्यू झाला होता. पुत्र वियोगाच्या दु:खातून सावरताना शेक्सपिअर हॅम्लेट लिहित होता. म्हणूनच नाटकाचं नाव हे मुलाशी मिळतं जुळतं ठेवलं गेलं. हा दावा आहे ब्रिटनच्या लेखिका मॅगी ओपॅरेल यांचा.
मॅगी ओपरेल यांनी २०२० मध्ये हॅम्नेट ही कादंबरी लिहिली. यात विल्यम शेक्सपिअर आणि त्याची बायको अॅग्नेस नक्की कसे भेटले? त्यांची तीन मुलं आणि ११ वर्षांच्या हॅम्नेटचा मृत्यू. त्यानंतर अॅग्नेस आणि शेक्सपिअर यांच्या नात्यात आलेला दुरावा असं बरंच काही मॅगी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. शेक्सपिअरची ही गोष्ट अॅग्नेसच्या नजरेतून घडते. त्याकाळात शेक्सपिअर हा नाटककार आणि लेखक म्हणून उदयाला येत होता. अॅग्नेसनं त्याच्याशी लग्न केलं. ती त्याच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठी होती. एक मुलगा आणि दोन मुली असा त्यांचा संसार सुरू झाला. या काळात शेक्सपिअर फक्त काही कालावधीसाठीच अॅग्नेसकडे यायचा. बाकी वेळ तो लंडनमध्ये असायचा. याचवेळी प्लेगची साथ आली आणि ११ वर्षांच्या हॅम्नेटचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर अॅग्नेस आणि शेक्सपिअरमधले संबंध कमालीचे बिघडले. हॅम्नेटच्या मृत्युच्यावेळी शेक्सपिअर गावात नव्हता. अॅग्नेसला याचा खुप राग आला होता. मुलगा गेल्याचं दु:ख आणि नवरा सोबत नाही याचा राग हे सर्व मॅगीच्या कादंबरीत आलं आहे.
अर्थात हे काल्पनिक आहे, अप्रत्यक्षात असं घडलंच असेल याची शाश्वती नाही. पण खरं वाटेल इतकी प्रभावी मांडणी या कादंबरीची आहे. म्हणूनच वुमन प्राईज फॉर फिक्शन आणि नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवार्ड फॉर फिक्शन असे इंग्लंडमधले प्रतिष्ठेचे साहित्य पुरस्कार या कादंबरीला मिळालेत. २०२० च्या सुरूवातीला लोलिता चक्रवर्ती या ब्रिटिश अभिनेत्रीनं त्यावर नाटक ही केलं होतं. करोना काळात ते गायब झालं. पुढे गॅरिक थिएटर्सनं नव्यानं हॅम्नेट नाटक रंगमंचवार आणलं. आता मॅगी ओपॅरेलच्या या कादंबरीवर दिग्दर्शिका क्लोई जोनं हॅम्नेट (२०२५) नावाचा सिनेमा केला आहे.
नोमाड लँड (२०२१) या सिनेमासाठी क्लोई जोला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आता हॅम्नेट (२०२५)च्या माध्यमातून ती पुन्हा एकदा ऑस्करच्या स्पर्धेत उभी ठाकलेय. जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हॅम्नेटने बाजी मारलेय. नोमाड लँडप्रमाणे हॅम्नेटची गोष्ट ही स्त्रीवादी आहे. ही गोष्ट पूर्णपणे अॅग्नेसच्या नजरेतून घडते. शेक्सपिअर जवळपास सर्वच नाटकं पुरुष पात्राभोवती फिरतात. तरी या गोष्टी घडण्यासाठी स्त्री पात्रं जबाबदार असते. मॅगीच्या कादंबरीत अॅग्नेसच्या लैंगिकतेपासून, तिच्या निसर्गाबद्दलच्या आसक्तीबाबत सर्व आलं आहे. लग्नानंतर लगेच शेक्सपिअर नाटककार होण्यासाठी लंडनला निघून जातो. अॅग्नेसला हवा तेव्हा तो इमोशनली उपलब्थ नसतो. मग तो जेव्हढ्या दिवस गावात येतो तेव्हढ्या दिवसात ती त्याच्याशी भांडत बसत नाही. त्याला भरभरुन प्रेम देते. यातूनच एकापाठोपाठ तीन मुलं होतात. त्यांचा साभाल करते. पण प्लेग रोग पसरतो आणि त्यांचा ११ वर्षांचा हॅम्लेट तिच्या मिठीत जीव सोडतो. याने ती मानसिकदृष्ट्या बिथरते. यावेळी पहिल्यांदा ती शेक्सपिअरपासून मानसिकदृष्या वेगळी होते. त्याला लांब ठेवते. मुलाचं हातात प्राण सोडणं, शेक्सपिअरचं उपलब्ध नसणं यानं ती मानसिकदृष्या कमकुवत पण त्याचवेळी शेक्सपिअरबाबत अतिशय सक्त होते.
हॅम्नेटच्या मृत्यूनंतर शेक्सपिअऱ पुन्हा लंडनला निघून जातों. अॅग्नेस दु:खाला कवटाळते. जेव्हा हॅम्नेटच्या नावावर हेम्लेटची निर्मीती झालीय हे तिला कळतं तेव्हा ती चिडते. कथानकाची एकूणच मांडणी स्त्रीवादी आहे. वर-वर अग्नेसचं पात्र शांत असलं तरी तिच्या मनात वादळ घेऊन फिरतंय. त्याचवेळी पौरुषी जगाला आव्हान देण्याची ताकद तिला तिच्या अनुभवातून मिळालेलीय. पुरुष आणि स्त्री या दोघांची दु:खाला सामोरं जाण्याची पध्दत वेगवेगळी असते. बाई कधी अश्रुंच्या माध्यमातून आपल्या दु:खाला वाटत करुन देते. तर कधी शांतपणे ते संपण्याची वाट पाहते. याबाबतीत तिच्याकडे प्रचंड पेशन्स असतात. आशावाद असतो. पुरुषाचं तसं नसतं. तो दु:खाचा सामना वेगवेगळ्या पध्दतीने करतो. त्याचं फ्रस्ट्रेशन, अगतिकता सहज जाणवू शकते., पण स्त्रीचं तसं नसतं. तिचा चेहरा निर्विकार होतो. त्या पलिकडे काय सुरु आहे हे समजत नाही. हेम्नेटमध्ये ही असंच घडतं.