CSK vs LSG IPL 2025: काल झालेल्या चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यात  सुपर ठरली ती चेन्नई...२०१३ ची आय पी एल ...स्थळ चिन्नास्वामी ... जसप्रीत बुमरा चे पदार्पण..समोर...विराट कोहली...आणि सलग तीन चेंडूवर तीन चौकार ...बुमराहा गोंधळतो... मीड ऑफला उभे असलेले सचिन तेंडुलकर त्याच्या मदती साठी येतात..आणि बुमराह ला कानमंत्र देतात.." तू नाव पाहून गोलंदाजी करू नकोस..तर फक्त बॅट्समन ला गोलंदाजी कर" आणि पुढच्याच चेंडूवर विराट पायचीत सापडतो.... ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे दुसऱ्या पर्वातील शेवटची ५ षटके....जेव्हा महेंद्र सिंग धोनी फलंदाजी साठी आला तेव्हा खरे तर ऋषभ पंत ने हाच कानमंत्र आवेश आणि शार्दुल या दोघांना द्यायला हवा होता...या दोघांनी धोनी या नावा समोर गोलंदाजी केली..अतिरिक्त दबाव स्वतःवर घेतला ... नो..आणि वाइड चेंडूची खिरापत वाटली..आणि सामना चेन्नई चा झाला...अर्थात धोनी उत्तमच खेळला आणि खूप दिवसांनी त्याच्याकडून अपेक्षित असलेला फिनशिंग टच देऊन सामना जिंकून दिला...

खरे तर चेन्नई ने पॉवर प्ले ची लढाई जिंकून उत्तम सुरुवात केली होती..शेख रशीद आणि रचिन यांनी ५२ धावांची सलामी दिली..रशीद ने मारलेले ऑन साइड चे फटके त्याच्याकडून अपेक्षा वाढवून गेले.. पण सलामीच्या भागीदारी नंतर चेन्नई संघाकडून मोठी भागीदारी झाली ती धोनी आणि दुबे यांच्या मध्ये... २८ चेंडूत ५७ धावांची आणि तीच निर्णायक ठरली. धोनी येई पर्यंत हा सामना संतुलित अवस्थेतून पुढे जात होता.दहा षटकात जेवढ्या धावा लखनौ संघाच्या झाल्या होत्या साधारण तेवढ्याच चेन्नई संघाच्या...शेवटच्या ५ षटकात जेवढ्या धावा लखनौ ने केल्या होत्या तेवढ्याच चेन्नई संघाला हव्या होत्या..इथेच पूर्वीचा धोनी आला आणि सामना चेन्नई चा झाला..आज लखनौ  संघाचा कर्णधार ऋषभ पंत चा गृहपाठ थोडा कमी पडला असे वाटते...पंधरावे षटक जे दिग्वेश ने टाकले त्यात फक्त ३ धावा गेल्या होत्या आणि १ बळी आला होता...तिथेच त्याने पुढील षटक बिश्नोई कडून करायला हवे होते..कारण त्याने ३ षटकात फक्त १८ धावा देऊन २ बळी मिळविले होते.

खेळपट्टीवर नवीन आलेल्या धोनी चा स्ट्राईक रेट फिरकी गोलंदाजीपुढे कमी होता...पण कदाचित ऋषभ च्या मनात दुबे ची भीती होती... पण लखनौ मैदानाच्या सीमारेषा पाहता ती भीती सुद्धा व्यर्थ होती.संपूर्ण सामन्यावर फिरकीपटूंचे वर्चस्व असताना सुद्धा ऋषभ पंतने वेगवान गोलंदाजांवर भरोसा ठेवणे हा एक जुगार होता...आणि आपल्या सर्वोत्तम गोलंदाजांचे एक षटका शिल्लक ठेवणे हा कालच्या दिवशी गुन्हा होता...प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत ने ४९ चेंडूत ६३ धावा केल्या...त्यात ओव्हरटन च्या सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने रिव्हर्स स्कूप खेळला..आणि त्याने स्टुपिड या शब्दाला हम नहीं सुधरेंगे असेच उत्तर दिले..त्याला अब्दुल समद आणि मार्श यांनी उत्तम साथ दिली..आज बदोनी जीवदानाचा फायदा घेण्यात अयशस्वी ठरला..चेन्नई संघाकडून जडेजा आणि नूर यांनी चांगली गोलंदाजी करून लखनौ संघाला मर्यादित धावसंखेवर रोखले...लखनौ संघाच्या दृष्टीने पंत ला गवसलेला सूर ही त्यांच्यासाठी जमेची बाब आहे..आणि Bbu आजच्या दिवशी गोयंका साहेबांच्या मूड चांगला असण्यासाठी ही एकच गोष्ट पुरेशी आहे.....आजच्या सामन्यात धोनी सामनावीर ठरल्या मुळे आज अंबाती रायडू  अती अत्यानंदमुळे झोपू शकत नाही हे देखील तेवढेच खरे..