या पिढीचा सर्वात जास्त चॅलेंजिंग रोल करणारा अभिनेता राजकुमार राव नव्या रुपात आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय..आणि यावेळी तो दिसणार आहे थेट सुभाष चंद्र बोसांच्या भूमिकेत...
अल्ट बालाजीनं होम प्रोडक्शनने बोस डेड ऑर अलाईव्ह या वेब सीरिजची निर्मिती केलीय. या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आणि अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेला प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला...तो म्हणजे बोस डेड ऑर अलाईव्ह....
सव्वा दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सुभाष चंद्र बोस यांच्या त्या विमान दुर्घटनेनंतरही बोस जिवंतच आहेत, आणि ते नेहमी असेच गायब होतात याप्रकारचे डॉयलॉग्ज ऐकायला मिळतात. पण खरंच ते त्या दुर्घटनेनंतर जिवंत होते का? याचं उत्तर आपल्याला वेब सीरिज सुरु झाल्यावरचं कळेल.
ट्रेलरच्या उत्तरार्धात आपल्याला बोस अनेक वेशभूषांमध्ये दिसतात. या वेब सीरिजमुळं बोस यांनी नेमकं किती स्वत:ला गायब केलं, कितीवेळा त्यांना इंग्रजांना चकवा दिला, नेमकं त्यांचं बालपण, शाळकरी जीवन नक्कीच कळेल, हे ट्रेलरमधून दिसून येते.
बोस डेड ऑर अलाईव्हच्या ट्रेलरमध्ये राजकुमार रावनं जीव आणला म्हणायला हरकत नाही, कारण सव्वा दोन मिनिटांमध्ये नेमके सुभाष चंद्र बोस कसे होते ये दाखवण्यात निर्मात्यांना यश आलंय..बस सीरिजचे सर्व एपिसोड तितकेच प्रेक्षकांना रोखून ठेवणारे असावेत.
एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक, निर्माता आणि एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता...म्हणजेच हंसल मेहता आणि राज कुमार राव जोडी पुन्हा एक अॅडव्हेंचर घेवून येत आहे.. ते दोघे वेब सीरिजच्या दुनियेत काय जादू करणार का हाच प्रश्न आहे...
सिनेमेनिया : बोस डेड ऑर अलाईव्ह, उत्तर मिळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2017 10:40 PM (IST)
या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आणि अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेला प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला...तो म्हणजे बोस डेड ऑर अलाईव्ह....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -