व्यभिचार हा गुन्हाच मानला गेला पाहिजे, असं न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलं आहे. सेक्सबेस असलेले विषय कायम लोकप्रिय असतात आणि त्यावर भरपूर भल्याबुऱ्या चर्चा झडतात, तसंच ही बातमी आल्यावर देखील झालं. परंपरा हेच सांगतात आणि कायदाही हेच म्हणतो म्हटल्यावर कितीही उत्साहाचं उधाण येऊन चर्चा होत राहिल्या, तरीही व्यभिचाराविषयीचं माणसाचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाहीये; होण्याची शक्यता देखील नाहीये. पकडलं जातं तेव्हा ते पाप ठरतं, एरवी नाही; किंवा सिद्ध होतो तोच गुन्हा ठरतो, एरवी नाही... हे इथंही लागू आहेच. त्यामुळे अनेक प्रश्न चर्चेत येतात. उदाहरणार्थ : समाजात व्यभिचार असावा की असू नये? स्त्रीने केला तर वेगळा नियम आणि पुरुषाने केला तर वेगळा नियम असा भेदभाव केला जावा की जाऊ नये? विवाहित स्त्री ही नवऱ्याच्या मालकीची वस्तू मानली जाते, तर विवाहित पुरुष बायकोच्या मालकीची वस्तू का मानला जाऊ नये? असे एक ना दोन, अनेक प्रश्न पुन:पुन्हा विचारले जातात आणि आपापल्या बुद्धीप्रमाणे लोक उलटसुलट बोलत राहतात. दुसरीकडे या शाब्दिक चर्चांशी काही देणंघेणं नसलेले लोक विवाहबाह्य संबंध ठेवत राहतात; नवरा-बायको एकमेकांवर संशय घेत राहतात; कुणाच्या केसेस कोर्टात सुरु असतील ते अटीतटीने जोडीदाराच्या व्यभिचाराचे पुरावे शोधत असतात; खासगी डिटेक्टिव्हजच्या व्यवसायातील मुख्य उत्पन्नाचं साधन व्यभिचाराचे पुरावे शोधून देणं हेच असतं अनेकदा. निष्ठा वगैरे भानगडी नेहमी लैंगिक संबंधांवरच का निश्चित केल्या जातात, हा एक पेचच आहे. विवाहसंस्था ही 'पवित्र' आहे, त्यामुळे तिथं एकनिष्ठा महत्त्वाची, असं न्यायालयालाही वाटतं आणि पावित्र्य-अपवित्र्य, योनिशुचिता वगैरे नीती, धर्म यांच्या कक्षेत येणाऱ्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत आल्यावर देखील तीच परिभाषा कायम ठेवून बोलू लागतात, हे हास्यास्पद वाटू लागतं. विवाहाअंतर्गत लैंगिक संबंधांना समाजात प्रतिष्ठा आहे; कारण वैवाहिक संबंध हे सामान्यत: शास्त्रविहित, धार्मिक, नैतिक, कायदेशीर स्वरुपाचे असतात; असं मत विश्वकोशात नोंदवलं गेलेलं आहे. "विवाहप्राप्त व्यक्तीशी करावयाच्या संबंधासारखा इतर व्यक्तीशी केला जाणारा लैंगिक संबंध म्हणजे विवाहबाह्य संबंध होय. विवाहित स्त्रीने अगर पुरुषाने विवाहबंधनाने निगडित असलेल्या पतीच्या अगर पत्नीच्या व्यतिरिक्त इतरांशी स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे व्यभिचार  होय." - अशी व्याख्याही त्यात दिली आहे. विवाहबाह्य संबंध/व्यभिचार हे अर्थातच शास्त्र, धर्म, नीती, कायदा यांना अमान्य आहेत आणि त्यामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठाही नाही. प्रतिष्ठा, समाजमान्यता, संततीला औरसत्व मिळणे आणि कुटुंबसंस्थेचा परिपोष होणे या सगळ्यासाठी व्यभिचार आडवा येतो, असं वाटल्याने हा 'गुन्हा' निश्चित केला गेला होता. कोणत्या प्रकारच्या स्त्रीशी ठेवलेले लैंगिक सबंध हे 'व्यभिचार' ठरतात, गुन्हा मानले जातात, हे पाहिल्यावर तर यातील हास्यास्पदता अधिकच उघड होते. अविवाहित स्त्रीशी, विधवेशी, वेश्येशी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही, पण विवाहित स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी पुरुषाला शिक्षा होऊ शकते. (विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांना हे कलम लागू होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिजलाल विरुद्ध राज्य सरकार (१९९६) खटल्यात स्पष्ट केले होते.) वेश्या व्यवसाय हा गुन्हा आहे, तिथं वेश्येकडे जाणारा पुरुष गुन्हेगार नसतो, तर फक्त वेश्याच गुन्हेगार असते आणि तिला शिक्षा होऊ शकते. संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती दोन, दोघेही या कृत्यात समान भागीदार; पण विवाहितेचा प्रियकर तेवढा गुन्हेगार ठरतो आणि गिऱ्हाईकाची वेश्या तेवढी गुन्हेगार ठरते. म्हणजे कायदाही लिंगभेद मानतो. विवाहितेचा नवरा तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करु शकतो, पण पत्नीविरुद्ध नाही. पत्नीकडे फार तर तो या कारणाने घटस्फोट मागू शकतो, पण तिला गुन्हेगार ठरवू शकत नाही. हा प्रियकर विवाहित असेल, तर त्याची पत्नीही केवळ घटस्फोट मागू शकते; नवऱ्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करु शकत नाही. पतीची संमती असेल तर विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवू शकते, तो व्यभिचार गुन्हा ठरत नाही. आपली इच्छा नसताना देखील पतीच्या इच्छेनुसार/आज्ञेनुसार पत्नीला दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी संबंध ठेवावे लागले, भले त्यात तिची अनिच्छा असली, तरीही 'पत्नी ही पतीची मालमत्ता' असल्याने तो व्यभिचार देखील गुन्हा ठरत नाही; तो पतीच्या प्रगतीसाठी पत्नीने केलेला त्याग वगैरे असल्याने उदात्त मानला जातो. "पती-पत्नीमधील वादाचे मुद्दे हे फौजदारी कारवाईचे हत्यार उचलून नव्हे, तर संवाद आणि क्षमाशीलतेतून सुटावेत" आणि ते जमत नसेल तर घटस्फोटाचा कायदेशीर मार्ग अवलंबावा, असं 'पत्नी व्याभिचारी पतीविरुद्ध तक्रार का करु शकत नाही?' या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं गेलं आहे. स्त्री अबला आहे, पीडित आहे; खेरीज विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था टिकवण्याची जबाबदारी तिच्यावरच आहे त्यामुळे तिने फौजदारी कारवाईचं हत्यार वापरु नये... हे मत प्रचंड विसंगतींनी भरलेलं आहे, हे न्यायालयाच्या ध्यानात कसं आलं नाही, हेही आश्चर्याचंच आहे. अर्थात न्यायालय पितृसत्तेची पाठराखण करणारं असल्याने डोळे उघडायला वेळ लागणार, हे स्पष्टच दिसतंय. व्यभिचाराने मानसिक ताण निर्माण होतात, अस्थिरतेची भावना निर्माण होते, कुटुंबावर-विशेषत: मुलांवर त्याचे विपरीत भावनिक परिणाम होतात वगैरे कारणं व्यभिचाराला विरोध करणारे सांगतात; मात्र विवाहसंस्थेत-कुटुंबसंस्थेत हेच तोटे नसतात असं खात्रीने सांगू शकत नाहीत. इंडियन पीनल कोडचे कलम ४९७ अॅडल्टरी हा गुन्हा ठरविते. हिंदू विवाह कायद्याचा इतिहास आपल्यापैकी अनेकांनी वाचलेला आहे, तो मी पुन्हा सांगत नाही. ब्रिटिशांनी त्यात प्रामुख्याने काही बदल केले; नंतर अजून काही लहानसहान बदल त्यात होत राहिले आहेत. आज जी चर्चा होते आहे, ती कायद्याने (तरी) सर्वांना समान मानावे आणि लिंगभेद न करता स्त्रीपुरुषांसाठी एकच कायदा करावा या मुद्द्यावर. लग्नावेळी वराचं वय २१ आणि वधूचं १८ हा देखील एक असाच हास्यास्पद भेद आहे. घटस्फोटासाठी मात्र कलम १३ (१) च्या अनुसार (१) प्रतिवादीने विवाहानंतर स्वेच्छेने व्यभिचार केला आहे, या कारणासाठी पती व पत्नी दोघांनाही दावा करता येतो. जोसेफ शाइन यांनी आपले वकील सुविदुत सुंदरम यांच्यामार्फत भादंवि कलम ४९७ च्या वैधतेला आव्हान दिले असून त्यात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १९८(२) चाही  समावेश आहे. व्यभिचारात स्त्री व पुरुष या दोघांनाही कलम ४९७ अन्वये सारखेच जबाबदार ठरवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. कलम ४९७ नुसार व्यभिचार हा गुन्हा ठरवला जातो, ते कलम कायम ठेवण्यात यावं, असा युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. या कलमाच्या घटनात्मकतेची फेरतपासणी घटनापीठामार्फत सुरु करण्यात आली आहे असून यात लिंगभेद नसावा यावर विचार केला जातो आहे. विवाहसंस्था जितकी जुनी आहे, व्यभिचारही तितकाच जुना आहे. प्रत्येक मानवी समाजात दोन्हीही प्रकार समांतर वाटचाल करत आलेले आहेत. कधी व्यभिचारी स्त्रियांसाठी कायदे कडक होते, कधी त्यासाठी त्यांच्या प्रियकरांना दोषी मानलं जाऊ लागलं; पण स्त्रिया व्यभिचाराला नेमकं का प्रवृत्त होतात, याचा विचार मात्र क्वचितच कुणी केला. तिच्या लैंगिक गरजांचा उल्लेख देखील पाप मानल्या गेला, त्या समाजात हा विचार व्हायला आता कुठे सुरुवात झाली आहे. आपण स्वेच्छेने कुणाशी लैंगिक संबंध ठेवायचे, हे ठरवणं हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे; त्यामुळे व्यभिचार हा कायद्याने 'गुन्हा' ठरवला जाऊ नये, असा विचार तज्ञ मंडळींकडून मांडला जातो आहे, तो रास्तच आहे. व्यभिचार करुन पाहायचा की नाही, हे आता अर्थात ज्याच्यात्याच्या वा जिच्यातिच्या इच्छा, गरजा, जोखीम घेण्याची क्षमता वगैरेंवर अवलंबून आहे.

संबंधित ब्लॉग :

चालू वर्तमानकाळ : (47) वृद्धांना ‘घरात मरण येऊ द्या’चे लळेलोंबाळे चुकीचे! चालू वर्तमानकाळ : (46) जे जे बीभत्स, असुंदर, अमंगल चालू वर्तमानकाळ : (45) आईची जात

चालू वर्तमानकाळ (44) : माणसं मरणार असतात...!

Continues below advertisement

चालू वर्तमानकाळ (43). रताळे, केळे, आंबा, खीर वगैरे

चालू वर्तमानकाळ (42) : कॅज्युअल सेक्सची पहिली गोष्ट

चालू वर्तमानकाळ (41) : वय स्वीकारण्यातली सहजता चालू वर्तमानकाळ (40) : मनातल्या मनात मी चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या चालू वर्तमानकाळ (38) : आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा... चालू वर्तमानकाळ (37) : वंचितांच्या यशाची शिखरं चालू वर्तमानकाळ (36) : अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं? चालू वर्तमानकाळ (35) : त्या पळाल्या कशासाठी? चालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे  चालू वर्तमानकाळ : (33) : अभ्यासकाचे जाणे! चालू वर्तमानकाळ (32) : आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ (31) : आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!   चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे  चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान् चालू वर्तमानकाळ (25 ) : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ (22) : लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो…  चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (14) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’   चालू वर्तमानकाळ (12) : लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (9) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ (6) : उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (2) : अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

Continues below advertisement