एक्स्प्लोर

BLOG : काँग्रेसचं राजकीय कुटुंब पुन्हा एकत्र येतंय का?

BLOG : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस... भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजच्या राजकारणापर्यंत सतत उपस्थित असलेलं नाव. गेल्या दशकभरात काँग्रेसला पराभव, नेतृत्वावरील प्रश्नचिन्हं आणि संघटनात्मक कमकुवतपणा यांचा सामना करावा लागला. पण भारतीय राजकारणाचा इतिहास सांगतो की काँग्रेसला कधीही फक्त जागांच्या आकड्यांत मोजता येत नाही.

कारण काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही, तर अनेक राजकीय प्रवाहांचा उगमबिंदू आहे. गेल्या शंभर वर्षांत काँग्रेसमधून डझनावारी नव्हे तर जवळपास पन्नास राजकीय पक्ष बाहेर पडले. काही विचारधारात्मक मतभेदांमुळे, काही नेतृत्वाच्या संघर्षातून, तर काही प्रादेशिक महत्त्वाकांक्षांमधून. 

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, तेलुगू प्रदेशातील अनेक पक्ष, केरळ आणि ईशान्य भारतातील अनेक संघटना, या सर्वांची मुळे कधीतरी काँग्रेसमध्येच होती. या फुटींनी काँग्रेसला मोठं नुकसान केलं. कारण बाहेर पडलेले पक्ष भाजप किंवा डाव्या पक्षांची मतं घेऊन आले नव्हते; त्यांनी काँग्रेसचीच सामाजिक आणि राजकीय जागा व्यापली. परिणामी अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत झाली आणि राष्ट्रीय स्तरावरील तिची ताकदही कमी झाली.

पण भारतीय राजकारणात एक गोष्ट कायम असते परिस्थिती बदलत राहते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. २०१४ आणि २०१९ च्या पराभवानंतर काँग्रेसच्या भविष्याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. मात्र भारत जोडो यात्रेनंतर तयार झालेलं राजकीय वातावरण आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी यामुळे विरोधी राजकारणातील समीकरणं बदलू लागली.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या मित्रपक्षांनाही या नव्या राजकीय वातावरणाचा फायदा झाला. समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), डीएमके अशा पक्षांनीही आपापल्या राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे विरोधी आघाडीत काँग्रेसचं केंद्रस्थान पुन्हा मजबूत झालं. 

याच पार्श्वभूमीवर दोन नेत्यांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.. शरद पवार आणि ममता बॅनर्जी. हे दोघेही नेते अनेक वर्षे काँग्रेसपासून स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचं प्रतीक मानले गेले. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. ममता बॅनर्जींनी त्याआधी तृणमूल काँग्रेस उभारली. दोघांनीही काँग्रेसला पर्याय म्हणून स्वतःची राजकीय जागा निर्माण केली.

मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडी वेगळंच चित्र दाखवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवारांनी केलेलं भाषण विशेष लक्षवेधी ठरलं. जवळपास २९ मिनिटांच्या भाषणात त्यांनी मोठा वेळ पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या योगदानावर बोलण्यात घालवला. काँग्रेसच्या ऐतिहासिक भूमिकेचा गौरव केला. हे केवळ औपचारिक कौतुक नव्हतं; ते एका राजकीय संदेशाचं संकेतस्थळ वाटत होतं. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करणारे विश्लेषक एक गोष्ट कायम सांगतात, पवारांच्या विधानांचा अर्थ अनेकदा काही महिन्यांनी समजतो. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे फक्त कौतुक म्हणून पाहणं पुरेसं ठरणार नाही.

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. एकेकाळी काँग्रेसला राज्यात जागा न देणाऱ्या, राहुल गांधींच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या ममता आज दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत. राजकीय वर्तुळात तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवेल. पण महत्त्वाचा मुद्दा दुसरा आहे. भारतीय राजकारणातील अनेक प्रादेशिक पक्ष आज अस्तित्वाच्या संघर्षात आहेत. दुसरीकडे भाजपविरोधी राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसच एकमेव असा पक्ष दिसतो जो देशव्यापी संघटना, राष्ट्रीय नेतृत्व आणि सर्व राज्यांतील उपस्थिती या तिन्ही गोष्टी एकत्र देऊ शकतो.

म्हणूनच आजचा प्रश्न ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये येणार का किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय यापुरता मर्यादित नाही. खरा प्रश्न असा आहे की गेल्या तीन दशकांत काँग्रेसमधून बाहेर पडलेले राजकीय प्रवाह पुन्हा काँग्रेसभोवती एकत्र येऊ लागले आहेत का? जर तसं असेल, तर भारतीय राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. कारण १९९० नंतरचं युग हे काँग्रेसमधून फुटलेल्या प्रादेशिक शक्तींचं होतं. तर २०२९ च्या दिशेने जाणारं दशक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्या शक्तींच्या पुनर्रचनेचं ठरू शकतं.

कदाचित म्हणूनच आज काँग्रेसच्या जागा किती आहेत यापेक्षा एक वेगळा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतोय काँग्रेसचं राजकीय कुटुंब पुन्हा एकत्र येतंय का? याच प्रश्नाचं उत्तर पुढील काही महिन्यांत भारतीय राजकारणाची दिशा ठरवू शकतं.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
Embed widget