टोमॅटो 160 रुपये किलो
तुमच्या-आमच्या जेवणातून टोमॅटो गायब, यांचा मात्र सत्तासंघर्ष सुरूच

Continues below advertisement


पेट्रोलचा दर 106 रुपये लीटर
पब्लिकचा एसटीचा प्रवास, यांचे मात्र हेलिकॉप्टरने दौरे


तुरडाळ 100 रुपये किलो
समर्थकांकडून सोशल मीडियावर काढलं जातंय स्वस्ताईचं पीक


गॅस 1100 रुपयावर
70 वर्षांत अशक्य, ते 9 वर्षांत शक्य


सीएनजी 79 रुपये किलो
जनतेची गाडी गॅसवर, ते दाखवतात इलेक्ट्रिक, हायड्रोजनंचं स्वप्न


कोंथिंबीर जुडी 100 रुपयांवर
सामान्यांना कांदेपोहेही परवडेना, त्यांचा चिकनतंदुरीवर ताव


बँकेचा व्याजदर 3 ते 4 टक्के
सामान्यांना 10-12 टक्क्यांनी कर्ज, त्यांना मात्र बिनव्याजी कर्ज


10 लाख 9 हजार कोटींचं बुडीत कर्ज माफ
(कालावधी आर्थिक वर्ष 1017-18 ते 2021-22)
सामान्यांना नागवं करून कर्जवसुली, बड्यांच्या खात्यात कर्जमाफीचं दान


महाराष्ट्रात सरासरी वीजदर 10.46 रुपये
शेतकरी,सामान्यांकडून वसुली, वीजचोरांना मात्र संरक्षण


देशातील बेकारी 8.11 टक्क्यांवर
आपल्या पोरांना बेरोजगारीचा शाप, यांची राजकीय रोजंदारी जोरात


म्हणूनच आता तरी उघडा डोळे आणि...