छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपले नाव कोरले आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घेतलेल्या निर्णयाच्या मागे एक विशेष योजना असायची! महाराजांनी सुरु केलेल्या योजना, नियोजने आजही खूप महत्वाची आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजलिपी म्हणून मोडी लिपीचा वापर केला होता. मोडी लिपीचे प्रमुख वैशिष्ट्य हे की मोडी लिपीत अतिशय जलद लेखन होते, त्यामुळे स्वराज्याचे लेखन कार्य जलद होत असे. छ.शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीमध्ये लिहिलेली असंख्य कागदपत्रे आज वाचकांच्या प्रतिक्षेत आहेत. मध्ययुगीन भारताचा वैभवशाली समृद्ध इतिहास आज मोडीलिपी कागदपत्रामध्ये बंद आहे.



आजच्या पिढीला मोडी ही मायमराठीची एक जलद लेखनाची लिपी आहे, ही माहिती मिळावी. आजच्या तरुण पिढीला डिजीटल गोष्टी लगेच समजतात म्हणून ऐतिहासिक मोडी लिपीला डिजिटली उपलब्ध करुन तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आजच्या तरुण पिढीला छ. शिवाजी महारांजाच्या राजलिपीची माहिती व्हावी, तसेच मोडी लिपी बद्दल, वैभवाशाली समृद्ध इतिहासाबाबत तरुण पिढीच्या मनात एक आदरपुर्वक स्थान निर्माण व्हावे. यातूनच ऐतिहासिक मोडी लिपीचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून Modifier.IN या वेबसाईट ने www.enav.in हा उपक्रम सुरु केला आहे. www.enav.in च्या माध्यमातून आपण कोणतेही नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीमध्ये काही क्षणात डिजीटली आपल्या इमेलवर मिळवू शकता!



www.enav.in ह्या वेबसाईटला भेट दिल्यावर आपल्याला जे नाव पाहिजे आहे ते देवनागरी वा इंग्रजी भाषेत लिहावे. आपला संपर्क क्रमांक व इमेल आयडी नोंद करुन Submit करा. आपण दिलेल्या इमेल आयडीवर सदरचे मोडी नाव पाठविण्यात येईल. आपले व आपल्या मित्रपरीवारांची मोडी लिपीतील डिजीटल नावे तयार करुन घ्या! इमेलवर मिळालेले नाव स्वत:च्या सोशल मिडीया खात्यांच्या माध्यमातून शेअर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या अनमोल योगदानामुळे छ. शिवाजी महाराजांच्या राजलिपीला संवर्धन करण्याच्या कार्यास मदत होईल. शिवकार्यास आपले अनमोल योगदान द्या! ही नम्र विनंती!