एक्स्प्लोर

जिद्द जिंकली! 'स्विंग'च्या 'किंग'ची टीम इंडियात वापसी

Bhuvneshwar Kumar: एक खरा खेळाडू कधीही हार मानत नाही, तो फक्त वेळेची वाट पाहतो आणि आपल्या कष्टाच्या जोरावर नशीब बदलून दाखवतो... असंच काहीस घडलं आहे भुवनेश्वर कुमारसोबत. त्याचे करिअर आता संपुष्टात आले आहे आणि तो पुन्हा कधीच भारतीय जर्सीत दिसणार नाही... गेल्या चार वर्षांपासून भुवनेश्वर कुमारच्या बाबतीत हीच चर्चा रंगत होती. पण जिद्द, चिकाटी आणि अपार कष्टाच्या जोरावर माणसाने ठरवले तर काही करू शकतो, याचे उदाहरण देत बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारच्या अधिकृत निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. तब्बल चार वर्षांच्या लांब आणि खडतर प्रतीक्षेनंतर अखेर तो 'स्विंगचा जादूगार' पुन्हा एकदा भारताच्या नीळ्या जर्सीत मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.

जेव्हा वाटले होते की करिअर संपले...

22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध नेपिअर येथे (T20I सामना) शेवटचा सामना खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमार भारतीय संघाबाहेर फेकला गेला. एकदिवसीय विश्वचषक असो वा मागील दोन टी ट्वेंटी वर्ल्ड कप किंवा आत्ताचीच वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका... निवड समितीच्या योजनांमध्ये त्याचे नाव अचानक गायब झाले होतं. क्रिकेटच्या वर्तुळात अशा चर्चा होऊ लागल्या की आता भुवनेश्वरचे वय आणि फिटनेस पाहता त्याचे टीम इंडियातील पर्व संपले आहे. प्रत्येकाला असे वाटू लागले होते की एका महान स्विंग गोलंदाजाची कारकीर्द आता पडद्याआड जात आहे.

हार न मानता डोमेस्टिक आणि आयपीएल गाजवली

पण भुवनेश्वर कुमार एक वेगळ्याच जिद्दीने पेटला होता. भारतीय संघातून वगळले गेल्यानंतरही त्याने कधीही हार मानली नाही. त्याने आपले संपूर्ण लक्ष आपल्या गोलंदाजीच्या धारवर आणि फिटनेसवर केंद्रित केले. आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वात घातक आणि किफायतशीर गोलंदाजी करणाऱ्या मोजक्या गोलंदाजांमध्ये त्याचे नाव अग्रस्थानी राहिले. आरसीबी (RCB) फ्रँचायझींसाठी त्याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. आणि आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि यूपी टी-20 लीगमध्ये त्याने घाम गाळत सातत्यपूर्ण कामगिरी केली. प्रत्येक मुलाखतीत त्याचे एकच वाक्य असायचं "निवड होणे किंवा न होणे हे माझ्या हातात नाही. माझे काम मैदानावर 100% देणे हे आहे, जे मी करत राहील." त्यामुळे जेव्हा बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, तेव्हा तो केवळ एका खेळाडूचा विजय नाही, तर त्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा विजय आहे ज्याने कधीकाळी भुवीच्या पुनरागमनाचे स्वप्न पाहिले होते.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call :  आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Embed widget