नेहमीच्या रेस्टॉरन्टच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न ही सोशल्स करतात, त्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारची सजावट, मेन्यूतही अतिशय वेगळे बदल करुन तरुणाईच्या ग्रुप्सना हवं तसं वातावरण इथे निर्माण केलं जातं..तसंच अतिशय आरामशीर आसनव्यवस्था आणि सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या देशीविदेशी पदार्थांवर केलेल नवनविन प्रयोग यामुळे तर हा सोशल्सच्या प्रयोगाला युवावर्गानी अगदी डोक्यावर घेतलंय..
‘सोशल’ या शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ ‘समाजात रमणारा’, ‘समाजशील व्यक्ती’ असा होतो, पण कुठल्याही मोठया शहरातल्या किंवा ज्या शहरांना आपण मेट्रो सिटीज अशा शहरातल्या तरुणाईला आणि त्यातही यंग प्रोफेशनल्सना जर आता ‘सोशल’ या शब्दाचा अर्थ विचारला तर ते नक्की उत्तर देतील..’हॅंगआऊटची फेवरेट जागा’ - कारणही तसंच आहे सध्या तरुणाईच्या ग्रुप्समध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली रेस्टो बारची चेन आहे, त्या मॉडर्न रेस्टो चेनचं नावचं आहे.. सोशल.. अर्थात प्रत्येक सोशलच्याआधी ज्या भागात ते रेस्टॉरन्ट आहे त्या भागाचं नाव येतं आणि त्यापुढे सोशल हा शब्द येतो. आपण कुठल्याही सोशलच्या नावाचा बोर्ड जरा निरखून पाहिला की लक्षात येतं की एका युनिक स्टाईलमध्ये ते नाव लिहीलेलं असतं.म्हणजे कुलाबा सोशल असं नाल असेल तर सोशल शब्दाच्या स्पेलिंगमधल्या ‘o’ या अक्षराच्यामध्ये त्या भागाचा पिनकोड टाकलेला असतो. मुंबईत तर थेट दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगरात गोरेगावपर्यंत, तर पूर्व उपनगरात विक्रोळीपर्यंत विविध ठिकाणी ९ ते १० सोशल्स आहेत.. बरं या सोशल नावाच्या रेस्टॉरन्टच्या पुढे ‘रेस्टॉरन्ट’ हा शब्दही वापरायचा नसतो, केवळ चला सोशलला जाऊ, असं म्हणण्याची पद्धत आहे, त्यानंतर मग दुसरा प्रश्न असतो कुठल्या सोशलला.. हा प्रश्न मुंबईत विचारला गेला असेल तर आपण ज्या भागात राहतो किंवा ज्या भागात कामाला जातो त्यानुसार पर्यांय आता मुंबईत उपलब्ध आहेत, म्हणजे कुलाबा सोशल, खार सोशल, तोडी मिल सोशल पॅलेडीयम सोशलपासून ते थेट गोरेगाव सोशल, फन रिपब्लिक सोशल, विक्रोळी सोशलपर्यंत वेगवगेळ्या भागातल्या सोशल्सचे पर्याय युवावर्गासाठी मुंबईत उपलब्ध आहेत.. या सोशल्समधे सगळं काही वेगळंच असतं.. सगळ्यात वेगळं असतं ते प्रत्येक सोशलचं इंटिरियर..रॉ लुकचं इंटिरियर असं त्याचं वर्ण तरुणाईकडून केलं जातं..म्हणजे..आत गेल्यावर कुठल्याही भिंतीला तुम्हाला चांगला चकचकीत रंग लागलेला दिसणार नाही..उलट अगदी प्लॅस्टरिंगही न केलेल्या विटांच्या भिंती दिसतील.. टेबलं पण अगदी साधे, एखाद्या ढाब्यावर ठेवलेली टेबलं वाटावी अशी..त्यावर काचेचे ग्लासही थेट कंटीग चहाला जे ग्लास वापरले जातात अगदी तेच ग्लास इथे ठेवलेले दिसतात.. कुठे रंगसंगती साधण्यासाठी लोखंडी जाळ्याच दिसतात, तर कुठे भली मोठी अगदी जुनाट अशी लाकडी खिडकी, डेकोरेशन म्हणून जुन्या पद्धतीच्या टिनाच्या फोल्डींग खुर्च्यासुद्धा इथे भिंतीवर लटकवून ठेवलेल्या दिसतात ..एका कोपऱ्यातल्या टेबल आणि सोफ्यासमोर तर थेट पाळणाच टांगलेला दिसतो आणि तो नुसता शोभेचा नाही तर ग्रुपमधल्या एकाला बसण्यासाठी टांगलेला आहे. रेस्टोबार असल्यानं ड्रिंक्स हा महत्त्वाचा भाग आहे मेन्यूतला, पण ते ड्रिंक्स सर्व्ह करण्याची पद्धत तर सर्वात भन्नाट, एकेठिकाणी तर ड्रिंक्सच्या बाटल्या छतावरच लटकवलेल्या दिसतात..आपण मागवलेलं ड्रिंक चित्रविचित्र रव्हिंग ग्लासेस आणि बाटल्यांमधून आपल्यापर्यंत येतंच पण # टॅगच्या जोडीनं हिंदीत लिहीलेली नावं तर अतिशय रंजक असतात..म्हणजे तुम्ही मागवलेलं हार्डड्रिंक असेल तर त्या ग्लासावर #पौवा असं देवनागरीत लिहीलेलं असतं..मॉकटेल वगैरे असेल तर #ठंडा असं लिहीलेल्या ग्लासात किंवा थेट बाटलीतच ते ड्रिंक सर्व्ह केलं जातं...खाद्यपदार्थ सर्व्ह करण्याचाही पद्धत अशीच वेगळी, पारंपरिक रेस्टॉरेन्टच्या बाऊल आणि प्लेट्सना पूर्णपणे फाटा देणारी.. इथे पदार्थ सर्व्ह केले जातात एकतर थेट भल्यामोठ्या लाकडी ट्रेमध्ये किंवा आपल्या घरी जरी स्टीलचे मोठे वाडगे असतात तशा वाडग्यात किंवा थेट कागदात..एकतर रेस्टोबार असल्यानं इथल्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूकार्डात फिंगर फुड प्रकारात मोडणाऱ्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश केलेला दिसतो.. फ्रेंच फ्राईस, टॉस केलेल्या भाज्या किंवा टस केलेलं चिकन हे तर थेट कागदाच्या पुंगळीत सर्व्ह केले जातात.. आपण रस्त्यावर सुखी भेळ ज्या पद्धतीनं कागदाच्या पुंगळीतून खातो तसंच इथे कितीतरी पदार्थ खास सोशल्स स्टाईलने कागदात भरुन आपल्यापुढे येतात..इथे काही वैशिष्ट्यपूर्ण थाळी किंवा मिल्स मिळतात जे तरुणांच्या ग्रुप्समध्ये प्रचंड फेमस आहेत.. त्यांची लेबनिज पदार्थांची थाळी किंवा त्याला मॉडर्न भाषेत प्लॅटर म्हणता येईल, ती तर थेट पितळेच्या ताट वाटीतून सर्व्ह केली जाते, पितळेच्या ताटात फलाफल आणि पिटा ब्रेडसारखे पदार्थ खाणं हासुद्धा वेगळा अनुभव आहे.. पण सगळ्यात गमतीदार पदार्थ आहे तो पावाच्या ऐवजी पिटा ब्रेडमध्ये घालून सर्व्ह केला जाणारा वडा पाव..तिथे पावच नसल्याने त्याला ‘पिटा बाव वडा’ असं म्हंटलं जातं.. इथे दिवसाच्या कुठल्याही वेळी खाता येतील असे ब्रेकफास्टचे विविध प्रकारही सगळ्या खवय्यांमध्ये चांगलेच लाडके आहेत.. पंजाबी ब्रेकफास्ट, ब्रिटीश ब्रेकफास्ट, अमेरिकन ब्रेकफास्ट असा त्या त्या पद्धतीच्या नाश्त्याचा अख्खा ट्रे येतो आपल्यासमोर आणि विशेष म्हणजे हा ब्रेकफास्ट दिवसाच्या कोणत्याही वेळी मिळतो..म्हणून त्याला ऑल डे ब्रेकफास्ट असं म्हंटलं जातं.. नेहमीच्या रेस्टॉरन्टच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न ही सोशल्स करतात, त्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारची सजावट, मेन्यूतही अतिशय वेगळे बदल करुन तरुणाईच्या ग्रुप्सना हवं तसं वातावरण इथे निर्माण केलं जातं..तसंच अतिशय आरामशीर आसनव्यवस्था आणि सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या देशीविदेशी पदार्थांवर केलेल नवनविन प्रयोग यामुळे तर हा सोशल्सच्या प्रयोगाला युवावर्गानी अगदी डोक्यावर घेतलंय.. दिवसभर भरपपूर काम करायचं आणि संध्याकाळी मात्र ‘एन्जॉय’ करायचं असा सध्याच्या यंग प्रोफेशनल्सचा दिनक्रम असतो. त्या लाईफस्टाईलला अगदी पूरक अशी ही सोशल्सची चेन आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.. संबंधित ब्लॉग :