नववर्ष जल्लोषाच्या अगदी काही दिवस आधी मुंबईतल्या रेस्टॉरन्ट जगताची पंढरी मानल्या जाणाऱ्या कमला मिलमध्ये अग्नितांडव झालं आणि खवय्यांच्या लिस्टमधली साधारण तीस चाळीस रेस्टॉरन्ट एका झटक्यात कमी झाली, अर्थात खाण्याचा आनंद घेण्यासाठी अनधिकृत जागेत बांधलेल्या रेस्टॉरन्टमध्ये जाणं नक्कीच कुणी पसंत करणार नाही, मात्र चवदार खाण्यासाठी खवय्ये नवनवीन पर्यायांचा शोध घेणारच, त्यानुसार मुंबईतही नियमांचं पालन करुन चवदार पदार्थ देणाऱ्या जागेचा शोध सुरु झाला..आणि तो शोध थांबला गेल्या काही दिवसात अतिशय लोकप्रिय झालेल्या ग्रॅण्डमामाज कॅफे नावाच्या ब्रॅंडमुळे..
मुंबईच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या दादरमधल्या प्रितम हॉटेलचे मालक कोहली..त्यांचाच नवा कोरा पण अतिशय यशस्वी प्रयोग म्हणजे ग्रॅण्डमामाज कॅफे.  ग्रॅण्डमामाज कॅफेचं पहिलं आऊटलेट दादरच्या प्रितम हॉटेलच्याच शेजारी गेल्या वर्षी सुरु झालं आणि वर्षभरातच तरुणाईसाठी लाडकी हॅंगआऊट प्लेस म्हणून लोकप्रिय झालं.. वर्षभरातच मुंबईच्या विविध भागात या ग्रॅण्डमामाज कॅफेच्या चांगल्या पाच शाखा निघाल्यात, या पाचही शाखा तितक्याच तूफान चालतात.
सगळ्यात नवं आऊटलेट चेम्बूरला सायन ट्रॉम्बे मार्गावर डायमन्ड गार्डनसमोर सुरु झालंय..ग्रॅण्डमामाज कॅफेचं आकर्षण वाटण्याचं पहिलं कारण म्हणजे अगदी बाहेरुनसुद्धा आकर्षित करणारी ग्रॅण्डमामाज कॅफेची सजावट..जनरली सगळे ग्रॅण्डमामाज कॅफे हे इमारतीच्या खालच्या मजल्यावर अगदी ग्राऊंड फ्लोअरवरच आहेत (त्यामुळे आगबिग लागली तर लगेच बाहेर पडता येईल..) एखाद्या घराला बाहेरुन आणि आतून शुभ्र पांढरा रंग दिलाय की काय असं वाटावं अशी या ग्रॅण्डमामाज कॅफेची रंगसंगती अगदी बाहेरुनही दिसते...बाहेरच उभं राहिलं तरी आपलं लक्ष वेधून घेते ती नावाच्या पाटीच्या शेजारी वर लटकवलेली हिरव्या रंगाची सायकल..हिरवी सायकल आणि हिरव्याच खिडक्या अशी सगळी ऐट एखाद्या ब्रिटीशकालीन घरासारखी आणि रेस्टॉरन्टचा नाही तर घराचा फिल बघितल्यावरही येतो अशी ही ऐट.
पण त्यातही प्रमुख्याने जाणवतो तो हिरव्या चौकटींमधला चटक पांढरा रंग...सगळ्या सजावटीमध्ये हिरवा आणि पांढरा अशा दोनच चटक रंगांचं प्रबल्य... खुर्च्यांचा, सोफ्याचा रंगही शुभ्र पांढरा...शुभ्र पांढऱ्या भिंती आणि त्या पांढऱ्या रंगाला साजेशी भिंतीवरची सजावट. चेम्बूरच्या र्गॅण्डमामा कॅफेला मस्त अंगण आहे, अंगणातही बसण्याची सोय आहे आणि उन्हाच्या वेळीही थेट उन्हाचा तडाखा न लागता ओपन एयर लंचची सोय इथे केली असल्याने तर सुट्टीच्या दिवशी निवांत वेळ घालवण्यासाठी या जागेचा पर्याय सर्वांना हवाहवासा वाटतो.. अशा कल्पकतेनं सजवलेल्या निवांत जागेला किमान भेट तरी द्यायलाच पाहीजे असं पटकन मनात येतं.. जाऊन पांढऱ्या शुभ्र खुर्चीवर किंवा सोफ्यावर स्थानापन्न झालं की नजर आपल्या डोक्यावर जाते, पोपटाचा पिंजरा असावा असा हिरव्या रंहाच्या पिंजऱ्याच्या कोंदणात आपल्या टेबलवर प्रकाश टाकणारा बल्ब लावलेला दिसतो..ते पाहिल्यावर आणि आजुबाजुची सजावट पाहिली की मग मात्र बघणं पाहणं ही कामं थांबवून थेट लक्ष द्यावं लागतं ते पदार्थांकडे आणि चवींकडे, कारण एक मोठं मेन्यूकार्ड आपली वाट बघत असतं..शाळेतल्या परीक्षेला चिमटा आणि रायटिंग पॅड न्यायचो त्या पॅडला वेगवेगळ्या आकाराचे तीस चाळीस कागद अडकवून ठेवलेले असतात, हेच इथलं मेन्यूकार्ड..मेन्यूकार्डमध्ये अगदी एखददुसरा राजमा चावल किंवा खिचडीसारखा पदार्थ सोडला, तर बाकी सगळे पदार्थ नावातल्या कॅफे या शब्दाला साजेसेच आहेत..
खिचडी त्यातही भारतीय पदार्थ फार कमी, मात्र इथले लेबनिज आणि इटालियन पदार्थ खूप फेमस.. ग्रॅण्डमामाज कॅफे, ऑल डे कॅफे असं भलं मोठं नाव असल्यामुळे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांना खाता येतील अशा पदार्थांचा इथल्या मेन्यूकार्डात समावेश दिसतो.. अगदी सकाळी कॉफी आणि चहाच्या प्रकारांबरोबर खाता येतील असे अंड्याचे विविध प्रकार किंवा मुंबईच्या लोकांना आवडणारी चित्रविचित्र सॅण्डिविचेसपासून हेल्थबद्दल जागरुक लोकांसाठी सॅलड्सचे प्रकार असा सकाळच्या वेळी इथे गेलात तर खाता येईल असा मेन्यू..
सॅण्डविच पण त्यानंतर दिवसाच्या कुठल्याही वेळी गेलात तर त्यासाठी मात्र बर्गर्स आणि थीन क्रस्ट पिझ्झा हा सगळ्यांचा पहिला चॉईस असतो..तिथल्या तिथे फ्रेश बनवला जाणारा पिझ्झा खवय्ये जनरली मिस करत नाहीत...
फ्रेश पिझ्झा त्याच्या जोडीला हुम्मस आणि पिटा, पास्ता, मॅक आणि चिज, लसानिया, रिसोटो अशा आजकालच्या तरुणाईच्या हॉट फेवरेट झालेल्या पदार्थांची जंत्रीच असते..
पिटा बरं प्रत्येक पदार्थाचं प्रेझेंटेशन हे रेस्टॉरन्टच्या सजावटीइतकंच अफलातून..बर्गर, सॅण्डविच किंवा फ्रेंच फ्राईज यापैकी एखादा पदार्थ मागवला ज्याला टोमॅटो सॉसबरोबर खाता येतं, तर तो टोमॅटो सॉस मोठ्या युनिक पद्धतीने टेबलवर ठेवला जातो.. सॉसची इवलीशी वाटी असलेली तितकीच इवलीशी खेळण्यातली सायकल रिक्षाच टेबलवर आणली जाते..
सॉस टॅकोजचा एखादा पदार्थ मागवला तर छोट्या खाचा असलेलं भलं मोठं लाटणं येतं..त्या लाटण्याच्या खाचेमध्ये टॅकोजच्या पुऱ्या सजवलेल्या असतात..
टॅकोज साधी पंजाबी खिचडीदेखील अतिशय आकर्षक अशा पितळी भांड्यात सजवून प्रझेंट केली जाते.. अगदी प्रत्येक पदार्थाचं प्रझेंटेशन असं सुंदर असतं..म्हणजे चव घेण्याआधीच त्या पदार्थाबद्दलची उत्सुकता वाढवली जाते..प्रत्येक पदार्थांची चवही अगदी परफेक्ट..पण त्यातही त्यांचे पिझ्झाचे प्रकार सगळ्यात आकर्षक आणि चवदार..गरमागरम आंबट तिखट पिझ्झाची चव ग्रॅडमामाज कॅफेला गेल्यावर घ्यायलाच हवी. या कॅफेतले तसे सगळेच इटालियन पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरतात, मग पास्ता लसानिया असो किंवा रिसोटो.. पण ज्याच्या नावातच कॅफे आहे तिथे चहा कॉफी आणि इतर पेयांचीही रेलचेल असायलाच हवी आणि इथे ती बघायलाही मिळते..
कूलर्स गरम कॉफी आणि चहाचे वेगवेगळे प्रकार तर इथे बघायलाच मिळतात पण आईस कॉफी, आईस टी, कूलर्स, थिक मिल्कशेक्स यांचे वेगवेगळे पर्याय आपल्या जेवणाबरोबर ट्राय केलेच पाहीजेत असे जबरदस्त आणि हटके आहेत.. एखादेवेळी ब्रेकफास्टच्या वेळी आपण ग्रॅण्डमामाज कॅफेत दाखल झालो तर थेट लहानपणी अतिशय आवडत्या असलेल्या हॉट चॉकलेटचाही पर्याय इतर चहा कॉफीच्या विविध प्रकारांबरोबर चाखायला वेगळीच गंमत येते..
ग्रॅण्डमामाज कॅफेमध्ये केलेल्या सजावटीमध्ये जे संदेश आहेत, त्यात लिहीलंय की आम्ही आजीच्या पोतडीतल्या खास रेसिपीज या कॅफेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणतो आहोत, अर्थात ती आजी भारतीय, इटालियन अशी कुठलीही असू शकते, हा संदेशही वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू नक्कीच आणतो..तसंच विकेण्डसना किंवा संध्याकाळच्या वेळी रोजच्या धबडग्यातून निवांत क्षण ते ही चवदार पदार्थांच्या साथीने अनुभवायचे असतील तर हा नक्कीच चांगला पर्याय ठरु शकतो..

संबंधित ब्लॉग :

जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस

जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे

जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला

जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’

जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29

जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री

जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना

जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई  जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट