पंढरीची वारी हळूहळू पांडुरंगाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना या वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याला आस लागलेली असते ती सावळ्या विठ्ठलाचे समचरण पाहण्याची, या वारीदरम्यान प्रत्येक वारकऱ्याचा विठ्ठल झालेला असतो, त्याच्या नसानसात आणि रक्ता रक्तात फक्त त्या विठ्ठलाचा नाम गजर घुमत असतो. या विठ्ठलाच्या नामाचे वेड प्रत्येक वारकऱ्याला संपूर्ण आयुष्यभर लागलेले असते, वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संतांनी आपल्या परीने विठ्ठलाचे केलेले वर्णन हे जरी वेगवेगळे असले तरी आशय मात्र एकच असतो. 


संतांच्या प्रतिभेचे ज्ञानवंतांच्या प्रज्ञेचे तर लोकजीवनाच्या श्रद्धेच प्रतिष्ठान म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय ज्ञानावंतंच ज्ञान दर्शन आणि सामान्यांचे भावदर्शन जिथे एकवटत  तो म्हणजे पांडुरंग. विटेवरचं पांडुरंगाच सावळे रूप संतांना एवढे भावले की त्यांनी आपली सारी शब्दसंपदा विठ्ठलाच्या चरणी अक्षरशः वाहून दिली, संतांच्या वाङ्ममय रचनेचे दोन भाग पडतात पहिला म्हणजे प्रबंध रचना आणि दुसरा म्हणजे गाथा रचना. प्रबंध रचना ही एखादा तत्व चिंतनाचा विषय घेऊन त्यावर क्रांतिक पद्धतीने केलेली मांडणी होय तर गाथा रचना हा अंतर्मनाचा मुक्त आविष्कार असतो. 


विठ्ठलाच्या गुणसंकीर्तनांचा वेध घेत त्याच्या स्वरूपाच्या आणि गुणाचा अविष्कार हा संतांच्या वाङ्मयातून आपल्याला पाहायला मिळतो, विश्वातील लावण्यच आर्त झालं, पांडुरंगाचे ठायी एकवटलं आणि असं विश्वसौंदर्य मूर्त रूपात उभा राहिलं की ज्याच्या प्रभेने संपूर्ण विश्व सौंदर्यमय होतं असं प्रासादिक लावण्याच सौंदर्य रूप म्हणजे श्री विठ्ठल... संपूर्ण पंढरीच्या वारीमध्ये ते वारकऱ्यासोबत स्वतः विठ्ठल देखील सहभागी झालेला असतो अशी वारकऱ्यांची धारण आहे जेव्हा त्याचा भक्त प्रेमाने भजन गात त्याला भेटायला निघतो तेव्हा भगवंतही आपले राऊळ सोडून या भजन यात्रेत स्वतः सहभागी होतो वारकऱ्याच्या त्या भजना बरोबर भगवंतही बोलून स्वानंदाने त्याच्याबरोबर चालू लागतो वारकऱ्यांसमवेत भगवंताचे चालणे हेच भगवंताचे आनंद निदान आहे.


जेथे स्वानंद कंद गोविंद भक्ती प्रेमानेच एक एक पाऊल पुढे टाकतो तिथे विधी निषेधाचा शिरकाव तरी कसं होईल विधेनिषदांच्या पलीकडे नेणारी ही वाटचाल म्हणजे भागवत धर्माच्या म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या एकात्मतेचा एक विराट आविष्कार असतो, भक्ताने देवासाठी नाम गजर करीत चालावे हे स्वाभाविक आहे पण देवाने देव पण विसरून वारकऱ्यांच्या समवेत चालावे हे अलौकिक आहे वारकरी संप्रदायाचा हा मार्ग देवभक्तांनी एकत्रित चोखळलेला मार्ग आहे या मार्गावरून चालताना वारकरी देहात राहूनही देहातीत होतो देह धर्माचा अंकुर त्याच्यात उठत नाही ज्ञानगर्माचा ताठा त्याला जडत नाही सहज भजनामध्ये तो एक एक पाऊल पुढे टाकतो त्याच्या देह स्वभावाची लक्षणे त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण होतात. त्याच्या चालण्याच्या कृतीतही आत्मसमाधीची अनुभूती असते कारण तो ज्या मार्गावरून चालतो तो मार्गच पांडुरंग मार्ग झालेला असतो पंढरीच्या वारीतील वारकरी या मार्गाचा अधिकारी ठरतो... या पांडुरंगाचे वेर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. 


सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण ! नाही रूप वर्ण गुण जेथे, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज्यजोती ! ते हे उभी मूर्ती विटेवरी