चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट
एबीपी माझा वेब टीम | 08 Jan 2018 02:33 PM (IST)
चंकी पांडे म्हंटल की, डोळ्यासमोर हे गाणं हमखास येतच. चंकीची सगळी कारकीर्द मल्टीस्टाररमध्ये अनेक नायकांपैकी एक किंवा हिरोचा मित्र किंवा दुय्यम नायक अशा भूमिका करण्यात गेली. त्यात राजीव रायचा 'विश्वात्मा', बच्चन लीडमध्ये असलेला 'इन्सानियत', 'पोलिसवाला', 'लुटेरे' असे काही सिनेमे होते.
चंकी पांडेला विनोद करायला आणि स्वतःवर विनोद करून घ्यायला आवडत. त्याने एका मुलाखतीमध्ये स्वतःचा 'नॅशनल ट्रेजर' असा उल्लेख केला होता. लोक त्यावर खूप हसले आणि काहीजणांनी त्यावर टीका पण केली. नंतर दुसऱ्या मुलाखतीमध्ये चंकीने चूक सुधारली. दुसऱ्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, मला खरं तर नॅशनल डिझास्टर म्हणायचं होत. लोक पुन्हा हसले; पण यावेळेस कुणीच टीका केली नाही. कारण यावेळेस कुणी असहमत असण्याचा प्रश्नच नव्हता. हा किस्सा चंकी पांडेच्या कारकिर्दीचा गाळीव अर्क मानायला हरकत नाही. चंकी पांडे नावाच्या अभिनेत्याला कुणीच गांभीर्याने घेतलं नाही. अगदी स्वतः चंकी पांडेने पण. चंकी पांडेची रुपेरी पडद्यावर जी प्रतिमा आहे, तीच पडद्याबाहेरच्या खऱ्या आयुष्यात पण आहे. आचरट, व्रात्य आणि अतरंगी. स्वतःला कुणी गांभीर्याने घेऊ नये, याची तरतूद स्वतः चंकी पांडेनेच करुन ठेवली आहे. चंकी पांडे हे नाव सार्वजनिक आयुष्यात धारण करुन फिरणाऱ्या चंकीच खरं नाव आहे सुयश शरद पांडे. इंडस्ट्रीमध्ये 25 वर्ष घालवून आणि तब्बल ऐंशीच्या आसपास सिनेमे करुन पण लोकांना अजून त्याचं खरं नाव माहित नाही. संजय दत्तने ज्या 'रॉकी' सिनेमातून पदार्पण केलं त्यात चंकीने आपली पडद्यावरची पहिली वहिली भूमिका केली. ती इतकी छोटी होती की निर्मात्यांना श्रेयनामावलीत चंकीला श्रेय पण द्यावंसं वाटलं नाही. नंतर पण चंकीने तीन चार फिल्म केल्या. त्या कधी आल्या आणि कधी गेल्या ते कळलं पण नाही. चंकीची प्रेक्षकांनी सर्वप्रथम नोंद घेतली ती 'तेजाब' मध्ये. टुकार पोरांच्या टोळक्याचा लीडर असणारा बबन हा बेरोजगार तरुण चंकीने मस्तच रंगवला होता. सिनेमात अनिल कपूरचा ‘मुन्ना लार्जर दॅन लाईफ’ असला तरी चंकीचा बबन पण प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. 'तेजाब'मध्ये चंकी आणि दिनेश हिंगुचा एक भन्नाट सीन आहे. दहा रुपयांच्या नोटेचा गळ लावून एका कंजूष व्यापाऱ्याला (दिनेश हिंगु )चंकी पांडे त्याच्या सगळ्या मित्रांच्या जेवणाचं बिल भरायला लावतो असा तो प्रसंग पाहून ज्याला हसू येणार नाही असा माणूस सापडणं शक्य नाही. आणि 'तेजाब' म्हंटल की 'एक दो तीन' गाण्यावर गजब डान्स करणारी माधुरी पहिले आठवते आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी चालवत 'सो गया ये जहाँ' गाणं म्हणणारा चंकी पण आठवतोच. या गाण्याचा एक भन्नाट किस्सा आहे. 'सो गया ये जहाँ' हे गाणं सिनेमातून काढलं जावं, अशी मागणी सगळ्या वितरकांनी जोरदारपणे निर्मात्यांकडे केली आहे. हे गाणं खूप स्लो आहे आणि उगीच त्यामुळे चित्रपटाच्या कथानकात अडथळा येतो असा त्यांचा युक्तिवाद होता. निर्माता पण वितरकांची मागणी मानण्याच्या मनोवस्थेत होता. पण दिग्दर्शक एन.चंद्रा ते गाणं सिनेमात असण्यावर ठाम होता. त्यानं आग्रही भूमिका घेऊन ते गाणं सिनेमात ठेवायला लावलं. हे गाणं तुफान लोकप्रिय झालं. चंकी पांडे म्हंटल की, डोळ्यासमोर हे गाणं हमखास येतच. चंकीची सगळी कारकीर्द मल्टीस्टाररमध्ये अनेक नायकांपैकी एक किंवा हिरोचा मित्र किंवा दुय्यम नायक अशा भूमिका करण्यात गेली. त्यात राजीव रायचा 'विश्वात्मा', बच्चन लीडमध्ये असलेला 'इन्सानियत', 'पोलिसवाला' , 'लुटेरे' असे काही सिनेमे होते. चंकीने तो एकटा नायक असणारे पण सिनेमे केले नाहीत असं नाही. 'खिलाफ' नावाच्या सिनेमात तर तो चक्क माधुरी दीक्षितचा नायक होता. पण तो एकटा नायक असणारे सिनेमे एकजात आपटले. चंकीला कारकिर्दीत दुसऱ्यांदा सूर सापडला तो 'आँखे' मधून. हा सिनेमा चंकीला कसा मिळाला याचा एक मजेदार किस्सा आहे. हॉलिडे इन मधल्या एका पार्टीमध्ये चंकी टुन्न झाला होता. दारु पिऊन झिंगलेल्या अवस्थेत तो वॉशरुममध्ये गेला. तिथं अजून एक दुसरा इसम होता. त्याने चंकीला ओळखले. तो चंकीला म्हणाला, "मी निर्माता आहे. मी आत्ताच गोविंदासोबत इल्जाम नावाचा एक सिनेमा केला आहे. माझ्या पुढच्या सिनेमात तू काम करशील का?" चंकीने नशेतच तिथल्या तिथे होकार दिला. तो निर्माता होता पहलाज निहलानी आणि त्याने चंकीला ऑफर केलेला सिनेमा होता 'आँखे'. धन्य तो निर्माता आणि धन्य तो अभिनेता. 'आँखे ' सुपरहिट झाला. मध्यंतरी संपुष्टात आलेलं विनोदी चित्रपटांचं युग 'आँखे'मुळे पुन्हा सुरु झालं. डेव्हिड धवन-गोविंदा युगाची नांदी झाली. पण चंकी चांगली कॉमेडी करू शकतो, असा साक्षात्कार प्रेक्षकांना आणि निर्माता दिग्दर्शकांना झाला. 'आँखे'मध्ये एक माकड होत. त्याच्यापेक्षा जास्त माकडचाळे सिनेमात चंकी आणि गोविंदाने केले होते. पण 'आँखे'चा जितका फायदा गोविंदाला झाला, त्याच्या एक दशांश पण चंकीला झाला नाही. चंकीला पुढचे सगळे रोल विनोदी साच्यातले आणि हिरोचा भाऊ -मित्र असणारे असे मिळायला लागले. चंकीने दुसरे पर्याय चोखाळायला सुरुवात केली. दुसरा पर्याय त्याला एका अनपेक्षित ठिकाणी मिळाला. बांगलादेश. 1995 ला चंकीने पहिला बांगलादेशी चित्रपट स्वीकारला. तो सुपरहिट झाला आणि एका अनोख्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. चंकी पांडे आणि बांगलादेशी प्रेक्षकांची. बांगलादेशी प्रेक्षकांनी चंकी पांडेच्या बांगला चित्रपटांना डोक्यावर उचलून धरलं. दुसऱ्या देशात स्टारडम मिळण्याचं भाग्य यापूर्वी फक्त दोन भारतीय अभिनेत्यांना मिळालेलं आहे. राज कपूरला रशियामध्ये आणि रजनीकांतला जपानमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभली होती. चंकी त्या अर्थाने रजनीकांत आणि राज कपूरच्या श्रेणीत आहे, हे कितीही कटू वाटत असलं तरी सत्य आहे. बांगलादेश मध्ये सिनेमा करुन चंकीने भरपूर पैसा कमावला. पण एरवी उथळ प्रतिमा असणारा चंकी गुंतवणूक करुन भविष्य सुरक्षित करुन घेण्याच्या बाबतीत अतिशय समंजस निघाला. मिळालेला पैसा त्याने त्या काळी मुंबईतल्या रियल इस्टेट मध्ये गुंतवला. त्या काळी बांद्र्यासारख्या भागात वीस लाखात टू बी एच के फ्लॅट मिळायचा. चंकीने त्या काळात तिथं गुंतवणूक केली. आता वीस करोडमध्ये पण त्या भागात फ्लॅट मिळत नाही. चंकीने चिक्कार पैसा कमावला. फारसे चित्रपट न करता पण चंकी आज पण इतकं लॅव्हिश आयुष्य कस जगतो आणि रोज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या कसा करतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच उत्तर चंकीच्या हुशार गुंतवणकीत दडलेलं आहे. एकेकाळी माकुल पैसा पाहिलेले कलाकार नंतर रस्त्यावर येतात, अशा कहाण्या सेलिब्रेट करणाऱ्या बॉलिवूडमध्ये असं उदाहरण वेगळंच. बांग्लादेशमध्ये सिनेमा करुन आपण पैसे तर मिळवत आहोत, पण भारतीय प्रेक्षकांच्या स्मृतींच्या बाहेर फेकले गेलो आहोत, हे एका टप्प्यावर चंकीला जाणवलं. सगळं सोडून तडक तो पुन्हा बॉलिवूडमध्ये वापस आला. यावेळेस काही तरी चांगलं काम करुयात आणि अभिनयाला थोडं गांभीर्याने घेऊयात असं त्यानं ठरवलं होत. त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला चक्क रामगोपाल वर्मा, तिगमांशू धुलियासारख्या वेगळा सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शकांसोबत काम करायला मिळालं. त्याचा 'डी' सिनेमातला थोडा भिकू म्हात्रेच्या पात्रावर बेतलेला राघव खरच भारी होता. ठरवलं तर चंकी पांडे अभिनय करु शकतो हे सिद्ध झालं. दुसऱ्या इनिंगमधले त्याचे 'बुलेट राजा','बेगमजान' मधले वेगळे रोल पण प्रेक्षकांना आवडले. साजिद खानच्या सिनेमांनी त्याला हिट सिनेमे मिळवून दिले तरी ते सिनेमे निव्वळ सुमार होते. नव्वदच्या दशकातल्या इतर अनेक स्टारप्रमाणे चंकीवर पण अंडरवर्ल्डशी साटेलोटे असल्याचा आरोप लागला होता. अबू सालेमसोबत त्याचे वैयक्तिक संबंध असल्याचा दावा केला जातो. गुलशन कुमार यांची हत्या झाल्यानंतर ज्या बॉलिवूड मंडळींची पोलिसांनी चौकशी केली होती त्यात चंकी पण होता. पण चंकीने हात वर केले. आपण अबू सालेमला ओळखतच नाही असा पवित्रा घेतला. गुलशन कुमार यांची हत्या झाल्यावर देशभरात अस्वस्थ वातावरण होत. काही जागतिक घडामोडींमुळे जगभरात पण अस्वस्थ वातावरण होत. त्यावेळेस विख्यात हिंदी कवी उदयप्रकाश यांनी त्या अस्वस्थ वातावरणाचा वेध घेणारी 'चंकी पांडे मुकर गया है' नावाची कविता केली होती. निव्वळ अप्रतिम आहे. तत्कालीन संदर्भ बदलले असले तरी आजच्या जाती धर्माच्या विषाने कलुषित झालेल्या आणि अभिव्यक्तीसाठी अतिशय वाईट वातावरण असणाऱ्या काळात ही कविता तितकीच समर्पक आहे. थोडी मोठी आहे पण आवर्जून वाचा. चंकी पांडेवरच्या लेखाच्या निमित्ताने ही कविता काही लोकांपर्यंत पोहोंचली तरी लेखाचं सार्थक होईल. चंकी पांडे मुकर गया है लोकप्रिय टी-सीरीज़ कंपनी का मालिक गुलशन कुमार हत्या के वर्षों बाद भी अभी तक गाता है माता के जागरण के भजन, और दिखता है वैष्णो देवी की चढ़ाई चढ़ता हुआ, माथे पर बांधे हुए केसरिया स्कार्फ गोल मटोल चेहरा, काले घुंघराले बाल, चमकदार हंसती सी छोटी-छोटी रोमानी आंखें हर कोई जानता है कि वह पहले दरियागंज में चलाता था फ्रूट-जूस की दूकान इसके बाद उसने व्यापार किया संगीत का जिसकी कंपनी के कैसेट के लिए गाती है अनुराधा पौडवाल जिसके पति अरुण को अब सब भूल चुके हैं जो पहाड़ से प्रतिभा और संगीत लेकर गया था अपनी सुंदर पत्नी के साथ मुंबई अपनी किस्मत आजमाने उसके नाम का आधा हिस्सा अभी भी जुड़ा है अनुराधा के साथ कहते हैं अरुण पौडवाल की आत्मा म्यूझिक स्टूडियो में अभी भी आधी रात घूमती है वह साउंड मिक्सिंग करती है रात में गलत सुरों को सुधारती हुई गुलशन कुमार की आकांक्षा थी अनुराधा को लता मंगेशकर और अपने भाई किशन कुमार को ट्रेजेडी किंग दिलीप कुमार बनाने की वही किशन कुमार, जो मैच फिक्सिंग के मामले में गिरफ्तार हुआ था और जेल में बीमार पड़ा था फिर जमानत पर छूट गया था, जैसे सभी इज्जतदार और सम्मानित लोग छूट जाया करते हैं इस देश में यह वही मैच फिक्सिंग कांड था, जिसमें अजहरुद्दीन का क्रिकेट कैरियर बरबाद हुआ था जिसमें दक्षिण अफ्रीका की क्रिकेट टीम का कप्तान हैंसी क्रोनिए भी फंस गया था और विमान दुर्घटना में मरने के पहले तक नहीं हो सका था अपने देश की टीम में बहाल हालांकि भारतीय अदालत ने अजय जडेजा को बेदाग बरी कर दिया था और वह बल्ला लेकर फिर पहुंच गया था राष्ट्रीय टीम में खेलने अजय जडेजा की शादी हुई थी जया जेटली की बेटी के साथ जया जेटली के पति ने बढ़ी उमर में तलाक देकर दूसरी औरत के साथ घर बसा लिया था आश्चर्य था की दिल्ली के महिला संगठनों ने इस पर चुप्पी साधे रखी थी क्योंकि जया जेटली उसके पहले तहलका कांड में मशहूर हुई थीं, जिसके कारण रक्षामंत्री को इस्तीफा देना पड़ा था और बहुत प्रयत्नों के बावजूद मुश्किल था एक उत्पीडित भारतीय पत्नी का मेकअप कर पाना रही बात तहलका डॉट कॉम के तरुण तेजपाल और उनके साथियों की तो वे पोटा से बचते छिपते इस लोकतंत्र के बनैले यथार्थ में हमारी तरह ही कहीं घायल पड़े होंगे अब क्या-क्या कहा, क्या लिखा जाय हर किसी की स्मृति में ये सारी बातें हैं हालांकि विस्मृति के जो नये उपकरण खोजे गए हैं उनमें बहुत ताक़त है और जो शुद्ध साहित्य है वह विस्मरण का ही एक शातिर औजार है लेकिन जो ‘विचारधाराओं’ वाला साहित्य है वह भी सरकारी फंडख़ोरी और संस्थाओं की सेंधमारी की ही एक बीसवीं सदी वाली पुरानी इंडो-रूसी तकनीक है न किसी पत्रिका न किसी अख़बार में इतनी नैतिकता है न साहस कि वे किसी एक घटना का पिछले पांच साल का ही ब्यौरा ज्यों का त्यों छाप दें पचास-पचपन साल की तो छोड़िए किसी तथाकथित कहानीकार को भी क्या पड़ी है कि वह यथार्थवाद के नाम से प्रचलित कथा में ऐसा यथार्थ लिखे की पुरस्कार आदि तो दूर हिंदी समाज में जीना ही मुहाल हो तो बात आगे बढ़ाएं… एक ऐसी वीडियो रिकार्डिंग थी दुबई की जिसमें अबू सालेम की पार्टी में शामिल थे बड़े-बड़े आला कलाकार और साख रसूख वाली हस्तियां इसी टेप से सुराग मिलता था गुलशन कुमार की हत्या का लेकिन अदालत में चंकी पांडे ने कहा कि वह तो अबु सलेम को पहचानता ही नहीं और टेप में तो वह यों ही उसके गले से लिपटा हुआ दिखाई देता है ऐसा ही बाक़ी हस्तियों ने कहा हिंदुस्तान की अदालत ने भी माना कि दरअसल उस टेप में दिख रहा कोई भी आला हाक़िम हुक्काम, अभिनेत्रियां या अभिनेता अबु सलेम को नहीं पहचानता… और जो वह एक्ट्रेस उसकी गोद में बैठी चूमा-चाटी कर रही थी उसका बयान भी अदालत ने माना कि कोई ज़रुरी नहीं कि कोई औरत अगर किसी को चूमे तो वह उसे पहचानती भी हो तो लुब्बे लुआब यह कि अबू सालेम को पहचानने के मामले में सारे गवाह मुकर गए उसी तरह जैसे बी.एम.डब्लू. कांड में कार से कुचले गए पांच लोगों के चश्मदीद गवाह संजीव नंदा और उसकी हत्यारी कार को पहचानने से मुकर गए जैसे जेसिका लाल हत्याकांड के सारे प्रत्यक्षदर्शी मनु शर्मा को पहचानने से मुकर गए हर कोई मुकर रहा है इस मुल्क में किसी भी सुनवाई, गवाही या निर्णय के वक़्त कोई नहीं कहता कि वह समाज या संस्कृति के किसी भी भूगोल के किसी भी हत्यारे को पहचानता है यह एक लुटेरा समय है नयी अर्थव्यवस्था की यह नयी सामाजिक संरचना है आवारा हिंसक पूंजी की यह एक बिल्कुल नयी ताक़त है और इसमें जो कुछ भी कहीं लोकप्रिय है वह कोई न कोई अमरीकी ब्रांड है ग़ुलाम होने और गुलाम बनाने के सारे खेलों में अब बहुत बड़ा पूंजी निवेश है और जो आजकल का साहित्य है, जिसमें लोलुप बूढ़ों और उनके वफादार चेलों की सांस्थानिक चहल-पहल है वह भी अन्यायी सत्ता और अनैतिक पूंजी का देशी भाषा में किया गया एक उबाऊ करतब है यह भ्रष्ट राजनीति का ही परम भ्रष्ट सांस्कृतिक विस्तार है एक उत्सव… एक समारोह.. एक राजनेता और आलोचक, कवि और दलाल, संगठन और गिरोह में फ़र्क बहुत मुश्किल है अनेकों हैं बुश अनेकों हैं ब्लेयर साथियो, यह एक लुटेरा अपराधी समय है जो जितना लुटेरा है, वह उतना ही चमक रहा है और गूंज रहा है हमारे पास सिर्फ अपनी आत्मा की आंच है और थोडासा नागरिक अंधकार कुछ शब्द हैं जो अभी तक जीवन का विश्वास दिलाते हैं… हम इन्हीं शब्दों से फिर शुरू करेंगे अपनी नयी यात्रा…