पुण्यात 80 च्या दशकात पहिल्यांदाच कच्छी दाबेली सुरु करणाऱ्या रास्ता पेठेतल्या ठक्कर बंधूंच्या 'जय जलाराम' दाबेलीबद्दल मागे 'Abp माझा ' वर ब्लॉग लिहिला होता. सहज सांगायचं म्हणून,ठक्कर बंधूं गेले अनेक वर्ष चरितार्थासाठी फक्त आणि फक्त दाबेलीच विकतात. आठवड्याची सुट्टी वगैरे न घेता दररोज दुपारी गाडीवर दाबेली विकायला सुरुवात करतात. सहसा संध्याकाळी 7.30 पर्यंत रोजचा ताजा माल संपवून घरी परत जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने तयारी करुन पुन्हा गाडीवर उभे रहातात. ठक्करांच्या दाबेलीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात ते स्वतः बनवलेला कच्छी मसाला वापरतात. माझ्या मते, त्यांच्या चवीची तिच USP आहे. फक्त इथेच न थांबता प्रत्येक दाबेलीत मसाला भरल्यानंतर त्या दाबेलीवर जाड पोळपाट ठेवून, आतले मिश्रण पावाबरोबर एकजीव करुन घेतात. त्यानंतर त्या मिश्रणात शेव आणि ऑर्डरप्रमाणे चिज भरले जाते.
ह्या वेगळेपणामुळे ही दाबेली खाण्याबरोबरच ती करताना बघणे हाही एक झकास अनुभव असतो, असं मला वाटतं. त्यांच्या स्टॉलवरची दाबेली बघून, ब्लॉगच्या नियमित वाचकांपैकी अनेकांना तशी दाबेली घरी किंवा आपल्या फूड जॉईंटवरही करुन बघता येईल. म्हणूनच त्यांच्या ट्रेंडसेटर दाबेलीबद्दल आधी ब्लॉग लिहिलेला असूनही पुन्हा हा छोटासा व्हिडियो ब्लॉग केलाय. व्हिडियो ब्लॉगचा माझा हा पहिलाच उत्स्फूर्त प्रयोग असल्याने ह्यात काही छोट्यामोठ्या उणीवा राहून गेल्या आहेत.त्या सांभाळून घ्याल ह्याची खात्री आहे. जय जलाराम कच्छी दाबेली
  • अपोलो टॉकीज- केईएम हॉस्पिटल रस्ता,रास्ता पेठ,पुणे
  • वेळ : दररोज दुपारी 3 ते जास्तीत जास्त रात्री 8 पर्यंत
अंबर कर्वेंचा व्हिडीओ ब्लॉग संबंधित ब्लॉग ब्लॉग : पुणेकरांचा विश्वास-अग्रज खादाडखाऊ : पुण्यातील दोराबजी & सन्स खादाडखाऊ : 'धुंधुरमास' स्पेशल खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख  खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी खादाडखाऊ : पुण्यातले इराणी मित्रो !!! आज खिचडी पुराण खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!   खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा