Yearly Numerology 2026 Of Mulank 2 : 2025 वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी खरंतर आपण सगळेच फार उत्सुक आहोत. कारण येणारं नवीन वर्ष आशा, आकांक्षा आणि अनेक स्वप्नं घेऊन येतं असं म्हणतात. पण, हे नवीन वर्ष (New Year 2026) आपल्यासाठी नेमकं कसं असेल? याबाबत अनेकांना कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार (Ank Shastra) कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

Continues below advertisement

सर्वात आधी 2026 हे वर्ष मूलांक 1 दर्शवते. मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य हा ग्रह ऊर्जा, नेतृत्व आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. या ठिकाणी आपण मूलांक 2 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 2 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक 2 साठी कसं असेल ते जाणून घेऊयात. 

कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2026)

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, 2026 हे वर्ष तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. जे लोक आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्ष अधिक भावनिक जाणार आहे. या काळात जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं असेल. तसेच, तुमच्यातील गैरसमज वेळेनुसार दूर होतील. जर तुम्ही सिंहल असाल तर तुमची एखाद्या खास व्यक्तीबरोबर ओळख होईल. पण घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. 

Continues below advertisement

कसं असणार करिअर? (Yearly Career Numerology 2026)

करिअरच्या बाबतीत नवीन वर्षात तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक पर्याय खुले होतील. टीमवर्कमध्ये काम करणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल. जे लोक ऑफिस, कॉर्पोरेट आणि काऊंन्सिलिंग किंवा मिडिया क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्ष मोठं सरप्राईज घेऊन येणार आहे. मात्र, ऑफिस पॉलिटिक्सचा भाग होऊ नका. विरोधकांपासून दूर राहा. 

कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2026)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक बाबतीत नवीन वर्ष तुमच्यासाठी फार सामान्य असणार आहे. या वर्षात तुमच्या हातात पैसा येईल पण पैशांबरोबर तुमचा खर्चही वाढेल. विशेषत: भावनेच्या भरात येऊन पैसे खर्च करु नका. तसेच, एखाद्याला खुश करण्यासाठी किंवा मन मोकळं करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसा उडवू नका. थोडक्यात सांगायचं झाल्यास, आंथरुन पाहून पाय पसरा. 

कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2026)

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमचं आरोग्य एकदम चांगलं असेल. मात्र, तुम्हाला या वर्षात मानसिक शांततेसाठी तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी काही संकल्प करावा लागेल. या काळात ध्यान, योग आणि प्राणायाम करमं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Surya-Mangal Yuti 2026 : सावधान! 14 जानेवारीला 'या' राशींना धोका; सूर्य-मंगळाच्या 'विस्फोटक राजयोगा'ने एकामागोमाग येतील संकट