Weekly Lucky Zodiacs 18-24 December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे.ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडतो. ग्रहांच्या चालीमुळे काही राशींना शुभ फळ मिळते तर काही राशींना अशुभ फळ मिळते. ग्रहांच्या हालचालींच्या आधारे साप्ताहिक पत्रिका काढली जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे येणारा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. साप्ताहिक जन्मकुंडली ग्रहांच्या हालचालींच्या आधारे काढली जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे 18 ते 24 डिसेंबर 2023 येणारा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे, तर काही राशींसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा आठवडा शुभ राहील?


 


साप्ताहिक राशीभविष्य


ज्योतिषशास्त्रानुसार 18 ते 24 डिसेंबर 2023 चा आठवडा खास असणार आहे, नवीन आठवडा काही राशीच्या लोकांच्या जीवनात नाविन्य आणि चैतन्य आणणारा असेल, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.


 


मिथुन


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुम्ही प्रवास करू शकता. या आठवड्यात तुमची मदत करणारी माणसे भेटतील. कोर्टात केस चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येईल. प्रेम जीवन चांगले जाईल.


कर्क


कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यवान असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुम्ही व्यवसायाशी संबंधित एखादी मोठी डील करू शकता. लव्ह लाईफ चांगली राहील.


कन्या



कन्या राशीच्या लोकांसाठी आठवडा लकी ठरेल. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल. तुमच्या उत्पन्नाचे आणखी नवीन स्रोत निर्माण होतील. सामाजिकदृष्ट्या तुम्ही या आठवड्यात लोकांशी संपर्क साधाल. जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.


तूळ


तूळ राशीचे लोक या आठवड्यात काहीतरी नवीन करतील. ज्यामुळे तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा करिअर आणि व्यवसायात आनंद देईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुम्हाला काही कामात सन्मान मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांचा दर्जा वाढेल आणि त्यांचा सन्मान वाढेल.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 18 to 24 Dec 2023: नवीन आठवडा मिथुन, कन्या, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या