Weekly Lucky Zodiac Signs: ऑगस्ट (June 2026) महिन्याचा नवा आठवडा आजपासून सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा आठवडा अनेक बदल घेऊन येत आहे. 3 ते 9 ऑगस्ट 2026 असा हा नवा आठवडा असून या आठवड्याचे पुढचे 7 दिवस काही राशींसाठी खूप शुभ असतील. या काळात, ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे मागोमाग आणि डबल शुभ राजयोग बनतायत. ज्यामुळे 5 राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये नवीन बदल होताना दिसू शकतात. हा आठवडा कोणत्या राशींसाठी भाग्यवान राहील? (Weekly Lucky Zodiac Signs) जाणून घेऊया...

Continues below advertisement

आठवड्याचे पुढचे 7 दिवस, ग्रहांचा डबल राजयोग...(Weekly Lucky Zodiac Signs)

ज्योतिषींच्या मते, ऑगस्ट महिन्याच्या नव्या आठवड्याचे पुढचे 7 दिवस अनेक महत्त्वाच्या ग्रहांच्या शुभ हालचालींनी सुरू होत आहे. या आठवड्यात तब्बल दोन अत्यंत शुभ ग्रहयोग तयार होणार आहे. ऑगस्टच्या नव्या आठवड्यात हंस राजयोग आणि बुधादित्य राजयोग तयार होईल.. पुढच्या आठवड्यात बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. ऑगस्ट महिन्यात, बुधादित्य राजयोग आणि हंस राजयोगामुळे 5 राशींना करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नात वाढ मिळेल.. मागोमाग तयार होणाऱ्या अनेक शुभ ग्रहयोगांमुळे 5 राशींना फायदा होईल. या राशींना त्यांच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनातही चांगली बातमी मिळू शकते. हा आठवडा काही राशींसाठी विशेषतः भाग्यवान ठरू शकतो. हा काळ या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक संकेत देखील घेऊन येऊ शकतो. जाणून घेऊया...

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, पुढचे 7 दिवस तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा फायदेशीर करार मिळण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक वातावरणही आनंदी राहील. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.

Continues below advertisement

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, पुढचे 7 दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता असून, नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि एखादा शुभ कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि मन प्रसन्न राहील.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, पुढचे 7 दिवस कन्या राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकते. कार्यालयातील महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. मुलाखत, स्पर्धा परीक्षा किंवा नवीन प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना उत्पन्न वाढवणाऱ्या नवीन संधी मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतही वाढेल. आरोग्याच्या दृष्टीनेही आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, पुढचे 7 दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा मोठा व्यवहार फायदेशीर ठरू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चर्चा होऊ शकते. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल.

मकर (Capricorn)

ज्योतिषशास्त्रानुसार, पुढचे 7 दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन नोकरी, पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढेल आणि आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने अनेक अडचणी सहज दूर होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. घरातील वातावरणही उत्साही आणि आनंददायी राहील.

हेही वाचा :

Shani Dev: वयाच्या 40 नंतर खरा जॅकपॉट! शनिदेवांच्या 'या' प्रिय जन्मतारखा, ज्यांच्यावर सदैव कृपादृष्टी, अंकशास्त्र...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)