Weekly Lucky Zodiac Signs :ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबरचा (November 2025) चौथा आणि शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. मार्गशीर्ष महिना सुरु झाला आहे. तसेच, या कालावधीत अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्याचबरोबर, अनेक शुभ राजयोग देखील पाहायला मिळतील. त्यामुळे पाच राशींना चांगला लाभ मिळेल. तसेच, त्यांची प्रगती होईल. या आठवड्यात कोणत्या राशी भाग्यवान (Weekly Lucky Zodiac Signs) असतील या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा भाग्यशाली असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग जुळून येतील. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभदेखील मिळण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी धनलाभ मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी हा आठवडा सुख-समृद्धीचा असणार आहे. भौतिक सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तसेच, या काळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. प्रवासाला जाण्याचे अनेक शुभ योग जुळून येतील. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला न्याय देता येईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा असणार आहे. या कालावधीत तुमच्या कामकाजात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, इतरांनी दिलेल्या सल्ल्यांचा तुम्हाला लाभच मिळणार आहे. संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. तुमच्या कामात तुमचं मन चांगलं रमेल. तसेच, पैशांचा खर्च वाढू शकतो. मात्र, उत्पन्नाची साधनेही निर्माण होतील. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मात्र, जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे सहज पूर्ण होतील. 

हे ही वाचा :                                            

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : आजपासून 7 राशींचं भाग्य उजळणार! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणार? पैसा, करिअर, प्रेम जीवन? साप्ताहिक राशीभविष्य