Weekly Horoscope Lucky Zodiac Signs : वैदिक शास्त्रानुसार, डिसेंबर (December 2025)महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा सर्व 12 राशींसाठी तर महत्त्वाचा असणारच आहे. मात्र, या काळात काही भाग्यवान राशी आहेत. ज्यांच्यावर ग्रहांची शुभ स्थिती आहे. तसेच, देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आहे. या काळात नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, हाती घेतलेली कार्यही पूर्ण होतील. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात (Weekly Horoscope) कोणत्या 5 राशींना ग्रहांच्या संक्रमणाचा लाभ मिळणार आहे. तसेच, या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा फारच लकी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी नेतृत्त्वाची भूमिका निभावताना घाबरु नका. तुम्ही घेतलेले निर्णय इतरांसाठी फार महत्त्वाचे ठरतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तु्म्ही अनेक योजना राबवू शकता. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. यावेळी तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे तुम्हाला वेळेत पार पाडता येतील. या आठवड्यात नशिबाचे दार खास तुमच्यासाठी उघडतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात अगदी शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. घरातील वातावरण सकारात्मक असेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. फक्त तुम्ही जो निर्णय या कालावधीत घ्याल तो निर्णय घेण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फक्त पुरेशी झोप घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या नवीन भेटीगाठी होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. या दरम्यान अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. घरात आनंदी वातावरण राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा तुमचं भाग्य उजळवणारा असणार आहे. या काळात तुमच्या कामाची चांगली स्तुती होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता जाणवेल. या काळात तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या काळात तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुम्ही ठाम असाल. तुमच्या हातून चांगलं कार्य घडेल. समाजात मान-सन्मान मिळेल. तसेच, जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. अनेक शुभ योगांचा परिणाम या राशीवर होणार आहे. त्यामुळे प्रगतीचे अनेक संकेत दिसतायत. या काळात नशिबाची साथ तर तुमच्याबरोबर असेल पण मेहनत करण्यात कुठेच कमी पडू नका.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
