Weekly Horoscope Lucky Zodiac : नवीन वर्ष 2026 (New Year 2026)ला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्याचाही दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा (Weekly Horoscope) फार खास असणार आहे. कारण या दरम्यान मकर संक्रांतीसह (Makar Sankranti) अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या नोकरी मिळतील. तसेच, या आठवड्यात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीत चांगली भरभराट झालेली दिसेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक सोर्स निर्माण होतील. भविष्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार चांगला वाढेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. या काळात नोकरी, पैसा आणि प्रसिद्धी सर्व काही तुमच्याजवळ चालून येईल. समाजात तुमच्या कामाचं चांगलं कौतुक केलं जाईल. तसेच, सकारात्मक विचारांनी तुम्ही पुढे जाल. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मित्रांचा सहवास तुम्हाला लाभेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी हा काळ भरभराटीचा असणार आहे. समाजातील विविध क्षेत्रातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्ही या कालावधीत नवीन प्रॉपर्टीची देखील खरेदी करु शकता. पैशांची गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. या काळात जर तुम्ही मेहनत घेतलीत तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. मित्रांच्या सहयोगाने तुम्ही पुढे जाल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी सुरुवातीचे काही दिवस तणावाचे असू शकतात. मात्र, त्यानंतर सुखाचे आणि भरभराटीचे दिवस येतील. नकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूलाही भटकणार नाहीत. तसेच, तुम्ही मनशांतीसाठी धार्मिक यात्रेत सहभागी होऊ शकता. नोकरी, व्यवसायात प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा प्रगतीचा असणार आहे. या काळात तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते कुटुंबियांच्या सहमतीने घ्याल. समाजात तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला विकास झालेला दिसेल. घरात आनंदाचं वातावरण दिसेल. तसेच, मुलांचं अभ्यासात मन रमेल. नवीन गोष्टी करण्यासाठी ते उत्सुक असतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
