Weekly Horoscope 8 To 14 September 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात, तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा प्रेम जीवनात तुमच्यासाठी आधार ठरेल. तुमचा प्रेम जोडीदार कठीण परिस्थितीत तुम्हाला साथ देईल. समजूतदारपणा आणि विश्वासामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं तर, आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्या लोकांना अतिरिक्त काम आणि दबावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील परंतु निकाल तुलनेने उशिरा लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी संबंध ठेवा, याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल, ज्यामुळे आर्थिक दबाव निर्माण होईल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल आणि नवीन योजना नफ्याच्या संधी प्रदान करतील.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या आरोग्याची तसेच तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. थकवा, ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या टाळा. योग आणि प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - हा आठवडा प्रेम जीवनात शुभ ठरेल. तुमच्या प्रियकरांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. नातेसंबंधांमध्ये भावनिक ओढ वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून एक सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकेल

करिअर (Career) -  या आठवड्यात दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या आठवड्यात दिलासा मिळू शकतो. तुम्हाला चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा आर्थिक स्थिती मजबूतीचा असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. संचित संपत्ती आणि भौतिक सुखसोयी वाढतील. आठवड्याच्या उत्तरार्धात विशेष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य (Health) - आरोग्य सामान्य राहील. कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार तुम्हाला निरोगी ठेवेल.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा कसा असणार? धनलाभ कोणाला? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)