Weekly Horoscope 8 To 14 September 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रेमाच्या बाबतीत लय भारी असेल.  प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदाराच्या पाठिंब्याने वैवाहिक जीवन आनंददायी राहील. कुटुंबात भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्हाला पालकांचा पाठिंबा मिळेल.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत उत्तम प्रगती दिसून येईल. परदेशात उच्च शिक्षण किंवा करिअर-व्यवसायाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आतापर्यंत येणारे अडथळे हळूहळू संपतील. नोकरीत यश मिळवाल.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुमचा नवीन आठवडा उत्तम असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. आठवड्याच्या मध्यात अडकलेले किंवा कर्ज घेतलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि तुम्ही सुखसोयींवर खर्च करू शकाल.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आरोग्य उत्तम असेल, फक्त बाहेरचे पदार्थ जसे की जंक फूड खाणे टाळा, योग करा, एखाद्या कामात तुमचं मन रमवा. रोज भरपूर पाणी प्या. 

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ उत्तम राहील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. अविवाहित लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल.

करिअर (Career) -  या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल, कौतुक असेल, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी असतील. विरोधकांनाही तुमच्या कामाच्या शैलीचे कौतुक करावे लागेल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्ही जिथे प्रयत्न कराल तिथे पैसे मिळण्याची शक्यता असेल. अचानक नफा आणि गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळू शकतात.

आरोग्य (Wealth) - आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. हंगामी आजार टाळा आणि खाण्यापिण्यात निष्काळजी राहू नका. कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा. 

हेही वाचा :           

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा कसा असणार? धनलाभ कोणाला? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)