Weekly Horoscope 8 To 14 June 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 8 ते 14 जून 2026 हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नात्यात सकारात्मक बदल दिसतील. जोडीदारासोबत चांगला संवाद होईल. अविवाहित लोकांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण घाई करू नका.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत. नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा पदोन्नतीची चर्चा होऊ शकते. मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात ऊर्जा चांगली राहील, पण प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात नात्यात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद आवश्यक आहे. संयम ठेवल्यास संबंध सुधारतील.
करिअर (Career) - या आठवड्यात कामाचा ताण वाढेल, पण तुमची शिस्त आणि मेहनत यामुळे प्रगती होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मोठ्या गुंतवणुकीसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे.
आरोग्य (Health) - आठवड्यात ताण आणि थकवा जाणवू शकतो. पाठीचा किंवा सांध्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या..
हेही वाचा
