Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 8 to 14 June 2026: तूळ ते मीन राशींसाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करिअर, आरोग्य, शिक्षण आणि लव्ह लाईफ कसं असणार आहे? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 8 to 14 June 2026: आजपासून जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. 8 ते 14 जून असा नवा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या पॉवरफुल हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी जूनचा दुसऱ्या आठवड्यात नातेसंबंध आणि संवाद यावर या आठवड्यात जास्त लक्ष राहील. तुमच्या मतांना महत्त्व मिळेल, पण निर्णय घेताना घाई टाळा. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विशेषतः मोठे व्यवहार टाळा. प्रेमात स्थिरता येईल, पण गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी जूनचा दुसरा आठवडा आत्मविश्वास वाढेल पण रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळू शकते. आर्थिक खर्च अचानक वाढू शकतो.
प्रेमात जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा..
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, करिअर आणि स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासातून चांगले लाभ मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा आणि आनंद जाणवेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा कामाचा ताण वाढेल, पण तुमची मेहनत यश देईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा खर्च वाढू शकतो. कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा नवीन कल्पना आणि प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल. मित्र आणि नेटवर्किंगमधून फायदा होईल. अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारत जाईल. प्रेमात समजूतदारपणा आणि स्थिरता येईल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा मानसिक शांतता आणि आत्मचिंतनाचा काळ आहे. अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कामात स्थिरता राहील, पण मोठे बदल लगेच अपेक्षित नाहीत. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. कुटुंबात शांत वातावरण राहील.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















