Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 8 to 14 June 2026: मेष ते कन्या राशींसाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करिअर, आरोग्य, शिक्षण आणि लव्ह लाईफ कसं असणार आहे? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 8 to 14 June 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जून (June 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरत आहे, आजपासून जूनचा दुसरा आठवडा 8 ते 14 जून असा नवा आठवडा सुरु होत आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरले, हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. तुमच्या निर्णयांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च येऊ शकतो, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. आरोग्य सामान्य राहील
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा कामाचा ताण थोडा वाढू शकतो, पण तुमची स्थिरता तुम्हाला पुढे नेईल. दीर्घकाळ अडकलेले काम या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल, पण गुंतवणुकीबाबत सावध राहा. कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. आरोग्यात गॅस किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी जूनचा दुसराआठवडा संधींनी भरलेला आहे. नवीन कल्पना, मीटिंग्स आणि नेटवर्किंगमुळे फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. प्रवासातून लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रेमात आनंद वाढेल, नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आर्थिक स्थैर्य सुधारेल आणि जुन्या अडचणी कमी होतील. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कामात थोडा संथ गतीचा काळ जाणवेल, पण परिणाम स्थिर राहतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, विशेषतः मानसिक ताण कमी ठेवावा लागेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी या आठवड्यात तुमचे नेतृत्वगुण चमकतील. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि ओळख मिळेल. अहंकार किंवा हट्टीपणा टाळणे आवश्यक आहे, नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रेमात समजूतदारपणा वाढेल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा कामात शिस्त, नियोजन आणि मेहनत यामुळे मोठे यश मिळू शकते. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतात, विशेषतः नोकरी किंवा प्रोजेक्ट बदलाशी संबंधित. आरोग्य सुधारेल.
हेही वाचा
Shani Sade Sati: एका 'या' राशींच्या पाठीशी कर्माचे भोग! साडे 7 वर्षांचा कठीण काळ, आयुष्यात 'अशा' बदलांसाठी सज्ज व्हा, शनि परीक्षेतून कधी मिळणार मुक्तता?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















