Weekly Horoscope 7 To 13 July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope)व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत.
सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीसाठी नवीन आठवडा प्रेमाच्या बाबतीत फार संवेदनशील असणार आहे. प्रेमाच्या बाबतीत कोणालाही तुमच्यावर हक्क गाजवू देऊ नका. तुम्ही जोपर्यंत व्यक्तीला ओळखत नाही तोपर्यंत संवाद साधू नका. तुमचा विश्वासघात होऊ शकतो.
करिअर (Carrer) - करिअरच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. प्रगतीचे देखील अनेक मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, काही लोकांचं प्रमोशन देखील होऊ शकतं.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांच्या बाबतीत तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला छोट्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पचनासंबंधित तुम्हाला त्रास होऊ शकतो. मानसिक आरोग्य देखील जपण्याचा प्रयत्न करा.
कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कन्या राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पार्टनरकडून चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
करिअर (Career) - कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास,नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. संवादकौशल्य दिसून येईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला फार चांगले परिणाम मिळतील. मात्र पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये संतुलन ठेवण्याची गरज आहे. तसेच, वातावरणातील बदलांमुळे बाहेरचं खाणं टाळा. आजार उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
