Weekly Horoscope 7 To 13 April 2025 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा फार लाभदायी असणार आहे. या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणार आहे. मात्र, तुमच्या शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असेल. त्यामुळे सावधानता बाळगा. तसेच, तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी व्यवसाय काहीसा कोलमडणार आहे. मात्र, चिंता करण्याची गरज नाही. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. मात्र, ग्रहांची स्थिती काहीशी वेगळी असल्या कारणाने तुम्हाला अनेक संकटांचा देखील सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. या दरम्यान तुमची यात्रा यशस्वी ठरेल.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सुख-समृद्धीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही लव्ह लाईफ फारशी ठीक नसणार. तुमच्या पार्टनरबरोबर छोटे-मोठे वाद होऊ शकतात. तसेच, तुमचे पैसे देखील खर्च होऊ शकतात. वरिष्ठांकडून तुमचा अपमान देखील होऊ शकतो. मात्र, या गोष्टी फारशा मनाला लावून घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा समाधानकारक असणार आहे. या आठवड्यात तुमची समाधानकारक वृत्ती दिसून येईल. तसेच, तुमच्या नोकरीत देखील तुमची चांगली स्थिती असेल. कामाचा वाढता ताण असेल मात्र, तुम्ही तो अॅडजस्ट करु शकता. तसेच, कुटुंबियांबरोबर देखील तुमचं वर्तन चांगलं दिसून येईल. या आठवड्यात तुम्ही नव्या गोष्टी शिकण्याचा मनापासून प्रयत्न कराल. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा आशेच्या किरणासारखा असणार आहे. सध्या या राशीवर शनीची साडेसाती असल्या कारणाने कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु नका. मात्र, कोणाशी तिरस्काराने देखील वागू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मनासारख्या गोष्टी घडत नसल्या कारणाने तुमची चिडचिड होऊ शकते. अशा वेळी तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि गोष्टी सोडून द्या. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांनी देखील पुढच्या आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. शनीच्या साडेसातीचा प्रभाव या राशीवर देखील आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. तसेच, या आठवड्यात लांबचे प्रवासाचे योग टाळा. तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. तसेच, सतत शिकण्याची वृत्ती ठेवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Ram Navami 2025 : यंदाची रामनवमी ठरणार भाग्यशाली! 'या' 3 राशींवर असणार प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद; मागाल ती इच्छा होणार पूर्ण