Weekly Horoscope 6 To 12 April 2026: एप्रिल महिन्याचा (April 2026) नवा आठवडा उद्यापासून सुरू होत आहे, आणि दुसरा आठवडा म्हणजेच 6 ते 12 एप्रिल 2026 हा आठवडा अत्यंत खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे एप्रिलचा हा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात करिअर आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक चांगली राहील, पण अचानक खर्च वाढू शकतो. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात थोडे संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थिर आणि लाभदायक ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चर्चा होऊ शकते. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील, पण आहारावर लक्ष द्या.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदलाचा आहे. नोकरीत बदल किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी ओळख होईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक बाबतीत थोडी अनिश्चितता राहू शकते, त्यामुळे खर्च नियंत्रित ठेवा. कुटुंबात थोडा तणाव होऊ शकतो, पण संवादाने समस्या सुटतील. प्रवासाचे योग आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सर्दी-खोकल्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी हा आठवडा संयम आणि मेहनतीचा आहे. कामात अडथळे येऊ शकतात, पण हार मानू नका. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. आर्थिक बाबतीत मोठे निर्णय टाळा. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आरोग्याच्या दृष्टीने पोटाचे विकार टाळण्यासाठी योग्य आहार घ्या.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा आठवडा हा आठवडा यश आणि मान-सन्मान घेऊन येईल. नोकरीत चांगली प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवास आणि नवीन संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात काही किरकोळ वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधात समजूतदारपणा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा चांगला काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि ताण टाळा.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक आणि आनंददायी आहे. नोकरीत प्रगती होईल आणि नवीन प्रोजेक्ट मिळेल. व्यवसायात नफा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध मजबूत होतील. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा मेहनत आणि संयमाचा आहे. कामात थोडा ताण राहील, पण यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवन स्थिर राहील. विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यास यश मिळेल. आरोग्य ठीक राहील.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा आहे. नोकरीत नवीन संधी मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात चांगले बदल दिसतील. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सावधगिरीचा आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत ताण वाढू शकतो. व्यवसायात निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात समजूतदारपणा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात आनंद राहील. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शांत आणि सकारात्मक आहे. करिअरमध्ये स्थिरता मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंद राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! 6 पैकी 4 राशींचा भाग्योदय निश्चित, कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)