Weekly Horoscope 6 To 12 April 2026: एप्रिल महिन्याचा (April 2026) पहिला आठवडा अवघ्या काही दिवसांतंच संपणार आहे, आणि दुसरा आठवडा म्हणजेच 6 ते 12 एप्रिल 2026 हा आठवडा लवकरच सुरू होत आहे. ज्योतिषींच्या मते, या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे एप्रिलचा हा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. नवीन योजना यशस्वी होतील. मित्रांकडून मदत मिळेल. नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम ठरेल, भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. धनलाभाचे योग आहेत. नवीन जबाबदारी मिळू शकते.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी आठवडा कामात सावध राहा. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंध सुधारतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन सुरुवात होऊ शकते.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीने यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि करिअर दोन्हीमध्ये चांगला काळ आहे. नवीन योजना यशस्वी होतील. प्रवास आणि धनलाभाचे योग आहेत.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्या. प्रॉपर्टी किंवा वाहनासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. कामात स्थिरता राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. ग्रहांचे शुभ संकेत मिळत असल्याने नवीन ऊर्जा आणि सकारात्मक विचार मिळतील. मित्रांकडून मदत मिळेल. करिअरमध्ये बदलाची संधी मिळू शकते.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. गुंतवणूक आणि बचतीवर लक्ष द्या. कुटुंबात आनंद राहील.
हेही वाचा
Shani Dev: एप्रिल महिन्यात 3 राशींवर शनिदेवांचं विशेष प्रेम! नक्षत्र संक्रमण करताच भरभराट, डबल लाभ, श्रीमंतीचे योग...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
