Weekly Horoscope 6 To 12 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 6 ते 12 एप्रिल 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे एप्रिलचा नवीन आठवडा (Weekly Horoscope)तूळ ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा चांगला असणार आहे. या दरम्यान तुम्हाला मानसिक शांतता ठेवणं गरजेचं आहे. यासाठी कोणत्याही गोष्टीवर पटकन रिएॅक्ट होऊ नका. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. यासाठी विनाकारण पैसे खर्च करु नका. जबाबदारीने वागा. तसेच, घरगुती कामांमध्ये हातभार लावा. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा चांगला असणार आहे. पार्टनरबरोबर उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहाल ती पूर्ण करण्याचा प्रयत्नही कराल. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा काहीसा सावधानतेचा असणार आहे. या कालावधीत तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल. मात्र, तुमच्या कामावर नजर ठेवणारे पण बरेच असल्यामुळे थोडीशी सावधानता बाळगा. तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांकडे शेअर करु नका. तसेच, नात्यांच्या बाबतीत थोडं गांभीर्याने विचार करा. समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा हा धावपळीचा असणार आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात एकापाठोपाठ घडताना दिसतील. अशा वेळी तुमचं मन स्थिर ठेवा. आनंदी राहा. आणि आरोग्याची काळजी घ्या. महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. अशा वेळी योग्य वेळी ड़क्टरांचा सल्ला घ्या. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा काहीसा स्थिरतेचा असणार आहे. तुमच्या आयुष्यात एक प्रकारे स्थिरता येईल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागाल. कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणे प्रयत्न कराल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या कालावधीत तुमच्या विचारात नवीन कल्पकता दिसेल. तुमचा सकारात्मक दृष्टीकोन राहील. तसेच, तुमच्या वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवाल. तसेच, तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते. नवीन लोकांच्या संपर्कात याल. तसेच, नातेवाईकांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. या काळात तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. या आठवड्यात कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. तसेच, तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप